Next
भारतीय विद्या भवनमध्ये रंगणार ‘गान वंदना’
गदिमा आणि बाबूजी यांना सांगितिक मानवंदना
BOI
Thursday, November 01 | 05:32 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘ग. दि. माडगूळकर आणि सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाउंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सोमवारी, दि. पाच नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजता, गोल्डन मेमरीज निर्मित ‘गान वंदना’ हा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. याद्वारे गदिमा आणि बाबूजी यांना सांगितिक मानवंदना दिली जाणार आहे’, अशी माहिती ‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव आणि कार्यक्रमाचे संयोजक प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी दिली. 

‘‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाउंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत हा ६१वा कार्यक्रम असून, तो ‘भारतीय विद्या भवन’च्या ‘सरदार महादेव बळवंत नातू सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमात शशांक दिवेकर, चैत्राली अभ्यंकर, हेमंत वाळुंजकर हे गायक गीते सादर करतील. प्रसन्न बाम, राजेंद्र हसबनीस, राजेंद्र साळुंखे हे साथसंगत करतील. कार्यक्रमाचे निवेदन स्नेहल दामले करणार असून, कार्यक्रमाची निर्मिती आणि संकल्पना चैत्राली अभ्यंकर यांची आहे’,  असेही काकिर्डे यांनी सांगितले. 

चैत्राली अभ्यंकर
‘‘गोल्डन मेमरीज’ संस्था गेली चार वर्षे महाराष्ट्रभर गीतांचा प्रसार करीत आहे. पाच नोव्हेंबर रोजी संस्थेचा पाचवा वर्धापनदिन आहे. या पाच वर्षात संस्थेच्या वतीने विविध प्रकारचे एकूण ३८७ कार्यक्रम सादर केले आहेत’, अशी माहिती गोल्डन मेमरीज संस्थेच्या चैत्राली अभ्यंकर यांनी दिली. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link