Next
‘हुजपा’ महाविद्यालयात मराठी राजभाषा दिन उत्साहात
नागेश शिंदे
Thursday, February 28, 2019 | 11:51 AM
15 0 0
Share this article:



हिमायतनगर : शहरातील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयात (हुजपा) मराठी राजभाषा दिन व कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन आनंदात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्या उज्ज्वला सदावर्ते यांनी भूषविले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. जाधव यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले.

या वेळी मान्यवरांच्या हस्ते भित्तीपत्रकाचे अनावरण करण्यात आले. प्रा. जाधव यांनी विद्यार्थांनी मराठी भाषा संगोपनासाठी काय केले पाहिजे, मराठी भाषा ही संस्काराची भाषा आहे तिचा आपण अभिमान बाळगला पाहिजे, असे सांगितले.

या कार्यक्रमाचे आयोजन प्रा. डॉ. सूर्यप्रकाश जाधव व प्रा. डॉ. लक्ष्मण पवार यांनी केले. नंतर प्रा. प्रवीण सावंत, डॉ. के. बी. पाटील, प्रा. डॉ. सय्यद जलील, डॉ. एस. एन. भदरगे यांच्या उपस्थितीत मराठी वाङ्मय विभागाचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी विद्यार्थांनी तयार केलेल्या भित्तीपत्रकाचे विमोचनसुद्धा मान्यवरांच्या हस्ते झाले.

या प्रसंगी वेळी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष अनंत आंबटवार, माया आंबटवार, कृष्णा माने, शीतल कल्याणकर यांनी काव्यवाचन केले. डॉ. लक्ष्मण पवार यांनी प्रास्ताविक केले. प्रा. प्रवीण सावंत व डॉ. सूर्यप्रकाश जाधव यांनी मराठी भाषेचे महत्त्व विद्यार्थाना सांगितले. अनुशा जाधव हिने सूत्रसंचालन केले. अंजली ठाकरे हिने आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search