Next
सिनेमाचे दिवस
BOI
Friday, May 03, 2019 | 10:13 AM
15 0 0
Share this article:

चित्रपटांचे आकर्षण नाही असा माणूस सापडणे मुश्कील; मात्र तो कसा बनतो, त्यासाठी किती लोकांचे कष्ट व प्रतिभा पणाला लागते, त्यात कशा व किती अडचणी येतात, एवढे होऊन सुद्धा तो लागल्यावर त्याचे आणि पर्यायाने निर्मात्याचे भवितव्य कसे अधांतरी असते, हे आपल्याला माहित नसते. करसल्लागार अरुण गोडबोले यांनी चाळीसाव्या वर्षी निर्माता बनून या क्षेत्रात उडी घेतली. घरातून झालेला विरोध, आलेले बरे-वाईट अनुभव, मान-सन्मान या सगळ्यांचा सविस्तर व रोचक वृत्तांत म्हणजे त्यांनी लिहिलेले ‘सिनेमाचे दिवस’ प्रांजल आत्मकथन. 

चित्रपट काढण्याचे बीज बालवयात कसे रुजले, घरचे तापलेले वातावरण, डॉ. काशिनाथ घाणेकर, पंडित भीमसेन जोशी यांचा स्नेह, चित्रपटसृष्टीशी संबधित माणसांच्या भेटी अशी पार्श्वभूमी सांगून पहिला चित्रपट ‘कशासाठी प्रेमासाठी’चे चित्रीकरण, त्यानंतरचे चित्रपट, प्रेक्षकांचे प्रेम, आर्थिक लाभ, तर कधी आलेले अपयश याचा मागोवा लेखकाने यात घेतला आहे. सामान्य मराठी कुटुंबातील व्यक्तीने या मायावी चित्रनगरीत कसे यश मिळविले, हे यातून समजते.
     
पुस्तक : सिनेमाचे दिवस
लेखक : अरुण गोडबोले
प्रकाशक : कौशिक प्रकाशन
पाने : २९३
किंमत : ३६० रुपये 

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search