मुंबई/पुणे : भारतातील आघाडीची पर्यटन आणि पर्यटनसंबंधी आर्थिक सेवा देणारी कंपनी थॉमस कुक (इंडिया) लिमिटेडने आपल्या परकीय विनिमयाच्या व्यवसायासाटी महाराष्ट्रात लक्षणीय विकासाच्या संधी असल्याचे ओळखून त्यांचा लाभ घेण्यासाठी हिंजवडी, पुणे येथे शाखा सुरू केली आहे. ‘थॉमस कुक’चे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश अय्यर आणि परकीय विनिमयचे विक्री प्रमुख आणि रिलेशनशीप व्यवस्थापक दीपेश वर्मा यांच्या हस्ते या दालनाचे उद्घाटन करण्यात आले.
हिंजवडी हा भारतातील सर्वात मोठा स्पेशल इकॉनॉमिक झोन्सपैकी (एसईझेड) एक असून, तेथे भारतातील सर्वात मोठी कॉर्पोरेट हाउसेस, बहुराष्ट्रीय कंपन्या आणि प्रमुख आयटी कंपन्या कार्यरत आहेत. यामुळेच येथे ‘थॉमस कुक’च्या परकीय विनिमयाच्या व्यवसायासाठी लक्षणीय संधी मिळू शकतात. ‘थॉमस कुक’ने केलेल्या अंतर्गत संशोधनातून समोर आलेल्या माहितीमध्ये हिंजवडी-पुणे येथे व्यवसाय विकासाच्या दमदार संधी असल्याचे निरीक्षण मांडण्यात आले. हा परिसर व्यावसायिक प्रवासी, तरुण व्यावसायिक, कॉर्पोरेट्स आणि एसएमई यांचे प्रमुख केंद्र बनल्याने व्यवसायाच्या मुबलक संधी उपलब्ध झाल्या आहेत. या नव्या दालनाद्वारे कंपनी आपल्या परकीय विनिमयाच्या व्यवसायाच्या लक्षणीय मात्र अद्याप फारशा न वापरल्या गेलेल्या संधींचा लाभ घेणार आहे. हिंजवडी येथील नव्या शाखेमुळे ‘थॉमस कुक’चे पुण्यातील फॉरिन एक्सजेंज नेटवर्क सहावर, तर महाराष्ट्रातील नेटवर्क ३० वर गेले आहे.
प्रीपेड ट्रॅव्हल कार्ड, थॉमस कुक वन करन्सी कार्ड, भारतातील पहिले झिरो क्रॉस करन्सी रूपांतरण शुल्क असलेले पहिले प्रीपेड कार्ड, पुण्याच्या वेगाने विकसित होत असलेल्या ग्राहकांसाठी आरक्षणाचे सोपे मार्ग, फॉरेक्स अप, ऑनलाइन फॉरेक्स, फॉरेक्स ऑन मोबाइल, पुण्याच्या परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सवलतीतील विमान शुल्क, अतिरिक्त बॅगेज, विमा आणि परकीय विनिमय उत्पादने यांस शैक्षणिक फॉरेक्स, पैसे स्थलांतर (आवक आणि जावक असे दोन्ही), १२० देशांत उपलब्ध असलेली ‘परदेशात पैसे पाठवा’ योजना ग्राहकांच्या सोयीसाठी उपलब्ध असलेल्या परकीय विनिमय उत्पादने आणि सेवा या शाखेत उपलब्ध आहेत.
‘थॉमस कुक’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अय्यर म्हणाले, ‘महाराष्ट्र ही प्रमुख बाजारपेठ असल्याचे समोर आले आहे आणि पुण्यात होणारा विकास हा दमदार म्हणजे आमच्या परकीय विनिमय व्यवसायासाठी वार्षिक पातळीवर तीस टक्के विकास देणारा आहे. आम्ही पुण्यातील आमच्या नव्या दालनासाठी हिंजवडीचा परिसर निवडला आहे, कारण या परिसरात कौटुंबिक ग्राहक, तरुण व्यावसायिक आणि व्यावसायिक प्रवासी मोठ्या प्रमाणावर असून त्यांच्याद्वारे व्यवसायाच्या लक्षणीय संधी मिळतील.’
विक्री प्रमुख आणि रिलनेशनशीप व्यवस्थापक दीपेश वर्मा म्हणाले, ‘हिंजवडीतील आमचे नवे दालन विविध प्रकारची परकीय विनिमय उत्पादने आणि सेवा सोयीस्करपणे उपलब्ध करून देणारे आहे. बॉर्डरलेस प्रीपेड कार्ड, वन करन्सी कार्ड, फॉरेक्स मोबाइल अप यांसारखी आमची नाविन्यपूर्ण उत्पादने महाराष्ट्राच्या तंत्रज्ञानभिमुख प्रवाशांसाठी अतिशय फायद्याची असून, त्यामुळे व्यवसायात भरीव वाढ होईल याची आम्हाला खात्री आहे.’