Next
सिद्धार्थ फाउंडेशनतर्फे राजमाता जिजाऊ जयंती साजरी
मिलिंद जाधव
Wednesday, January 16, 2019 | 05:38 PM
15 0 0
Share this storyभिवंडी : वासिंद येथील सिद्धार्थ फाउंडेशनच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

या वेळी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून प्रमुख मार्गदर्शक पुंडलिक पांडुरंग पाटील, वासिंद भारतीय बौद्ध महासभेचे सरचिटणीस जागृती गायकवाड, संस्थेचे अध्यक्ष वसंत धनगर, संचालक बी. डी. चन्ने, एम. जी. वाढविंदे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रा. संतोष गायकवाड यांनी भूषविले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवश्री पुंडलिक पांडुरंग पाटील उपस्थित होते.

या वेळी मार्गदर्शन करताना पाटील म्हणाले, ‘१२ जानेवारी हा सर्व भारतीयांनी आपल्या मनात कोरून ठेवावा, असा दिवस आहे. महाराष्ट्राच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या, स्वराज्याचे स्वप्न साकारणाऱ्या स्वाभिमानी जाधवांची कन्या आणि भोसलेंची सून असलेल्या राजमाता जिजाऊंची जयंती बहुजन समाजाने वस्ती-वस्तीत मोठ्या उत्साहात साजरी केली पाहिजे. सर्व बहुजन समाजाने महापुरुषांचा इतिहास वाचला पाहिजे व आपले उद्धारकर्ते कोण हे समजून घेतले पाहिजे ही काळाची गरज आहे. विखुरलेल्या देशबांधवांना एकतेच्या सुत्रात गुंफून स्वराज्याचे जनआंदोलन उभे करणाऱ्या जिजाऊ माता यांचे जीवनचरित्र अत्यंत प्रेरणादायक आहे. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून रयतेचे स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडवले. जिजाऊंचे व्यक्तिमत्व म्हणजे धैर्य, शौर्य, प्रचंड आत्मविश्वास. आज जिजाऊंची शिकवण, संस्कार, त्यांचे विचार आपल्याला प्रगतीपथावर नेणारे आहेत.’या वेळी कोषाध्यक्ष डॉ. रत्नदीप शिवगण, संचालक सुरेंद्र शेवाळे, सहचिटणीस खैरनार, जितेंद्र खरे, जीवन पंडित, कमलाकर विशे, बौद्ध महासभेच्या माजी अध्यक्षा जयश्री शेवाळे, वाढविंदे, वासिंद भारतीय बौद्ध महासभेच्या महिला सदस्या, परिसरातील महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस अशोक गायकवाड यांनी केले. माजी अध्यक्ष जगदीश गायकवाड यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link