Next
आय डू व्हॉट आय डू
BOI
Monday, May 06, 2019 | 10:26 AM
15 0 0
Share this article:

‘माय नेम इज रघुराम राजन, आय डू व्हॉट आय डू’ (म्हणून मला जे करायचे ते मी करतो), असे एकदा भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले होते. या त्यांच्या वाक्याची प्रचिती वेळोवेळी आली. २०१३मध्ये रघुराम राजन यांनी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाची सूत्रे हाती घेतली तेव्हा भारतापुढे विदेशी चलनाचे संकट होते. त्यातून देशाला बाहेर काढत अर्थव्यवस्थेला स्थैर्य आणण्याचे काम त्यांनी प्रथम केले. 

२०१३ ते २०१६ या तीन वर्षांच्या कारकिर्दीत रिझर्व्ह बँक व देशाच्या विकासासाठी घेतलेल्या निर्णयांची, मध्यवर्ती बँकेच्या मुख्य पदावर बसणे म्हणजे काय असते, त्याचे अनुभव कथन रघुराम राजन यांनी ‘आय डू व्हॉट आय डू’मधून केले आहे. डोसानॉमिक्स ते कर्जमुक्ती अशा अनेक अर्थशास्त्रीय संकल्पना, विकासासाठी आवश्यक मुद्दे मांडले आहेत. अगदी नोटाबंदीवरील त्यांचे मतही यात जाणून घेता येते. पुस्तकाचा मराठी अनुवाद अजित ठाकूर यांनी केला आहे.
     
पुस्तक : आय डू व्हॉट आय डू
लेखक : रघुराम राजन 
अनुवादक : अजित ठाकूर 
प्रकाशक : मंजुळ पब्लिशर
पाने : २२६
किंमत : ३९९ रुपये 

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search