Next
‘अॅस्टेरिअल’ची ‘न्यूट्रेसंट’शी भागीदारी
प्रेस रिलीज
Friday, June 22, 2018 | 11:27 AM
15 0 0
Share this story

नवी दिल्ली : फुजी केमिकल ग्रुपची उपकंपनी वजपानी कंपनी ‘अॅस्टेरिअल’ने ट्रान्सेंडन्यूट्रेन्शिअल इंटरनॅशनल लि. (न्यूट्रेसंट) या भारतीय व जबाबदार न्यूट्रिशनद्वारे वेलनेसवर भर देणाऱ्या ‘न्यूट्रास्युटिकल’ कंपनीबरोबर सहयोगात्मक भागीदारी केली असून, न्यूट्रास्युटिकल क्षेत्रातील हा एक विशेष सहयोग आहे. या भागीदारीमुळे ‘न्यूट्रेसंट’ला केवळ स्वतःची विशेष मालमत्ती ठरेल, अशा नव्या फॉर्म्युलेशनवर व नैसर्गिक अॅस्टेक्सेंथिनच्या वापरावर लक्ष केंद्रित करणे शक्य होणार आहे. या सहयोगानुसार, नैसर्गिक अॅस्टेक्सेंथिन व विविध प्रकारचे विशेष फॉर्म्युलेशन बाजारात आणण्यासाठीचे विज्ञान व तंत्रज्ञान घडवण्यासाठी ‘अॅस्टेरिअल’ ‘न्यूट्रेसंट’ला शास्त्रीय व तांत्रिक पाठिंबा देणार आहे.

निरनिराळ्या बाजारांत पर्यावरण व शरीर या दोन्ही बाबतीत अॅस्टेक्सेंथिन अत्यंत महत्त्वाचे आहे. अॅस्टेक्सेंथिन हे शक्तिशाली, नैसर्गिकपणे होणारे कॅरोटेनॉइड पिग्मेंट असून, ते विशिष्ट प्रकारच्या सागरी वनस्पतींमध्ये व प्राण्यांमध्ये आढळते. अनेकदा ‘कॅरोटेनॉइड्सचा राजा’ असे संबोधले जाणारे अॅस्टेक्सेंथिन हे निसर्गात आढळणारे एक सर्वात शक्तिशाली आरओएस स्केव्हेंजर्स समजले जाते. अन्य प्रकारच्या आरओएस स्केव्हेंजर्सपेक्षा अॅस्टेक्सेंथिन वेगळे असून, ते शरीरात कधीही प्रो-ऑक्सिडंट ठरत नसल्याने व त्यामुळे ते कधीही घातक ऑक्सिडेशनला कारणीभूत ठरत नसल्याने ते विशेष महत्त्वाचे आहे.

‘न्यूट्रेसंटबरोबरच्या भागीदारीमुळे अत्यंत प्रभावी, निसर्गतः तयार होणारे आरओएस स्केव्हेंजर्स ग्राहकांपर्यंत पोहोचवले जाणार असल्याने ही भागीदारी अतिशय महत्त्वाची आहे. आम्ही न्यूट्रेसंट अॅकॅडमी ऑफ अॅडव्हान्स्ड आरओएस स्केव्हेंजर स्टडीजला नैसर्गिक अॅस्टेक्सेंथिनवरील शास्त्रीय संशोधन व माहिती याचेही योगदान देणार आहोत. ही अकादमी आरओएस स्केव्हेंजर्स, त्यांचा अभ्यास व त्यांचे फायदे या क्षेत्रातील संशोधनात लक्षणीय हातभार लावेल, असा विश्वास आहे,’ असे ‘अॅस्टेरिअल जपान’चे जनरल मॅनेजर एरिक कॅस्टन यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link