Next
‘आयडिया’तर्फे कॅशबॅक ऑफर
प्रेस रिलीज
Wednesday, May 16, 2018 | 10:23 AM
15 0 0
Share this story

मुंबई : आयडिया सेल्युलर या भारतातील सर्वांत मोठ्या टेलिकॉम ऑपरेटर्सपैकी एक असलेल्या कंपनीने ग्रामीण भारतात मोठ्या संख्येने असलेल्या टू-जी ग्राहकांसाठी नोकिया फिचर फोन्सवर आकर्षक कॅशबॅक ऑफर देऊ केली आहे. नोकिया १०५, नोकिया १३० आणि नोकिया १५० हे फिचर फोन्स विकत घेणार्‍या सर्व आयडिया ग्राहकांना खरेदीनंतरच्या १२ महिन्यांच्या कालावधीत ६०० रुपयांपर्यंत कॅशबॅक देण्यात येणार आहे.

२८ दिवसांसाठी वैध असणार्‍या ५० रुपयांचा टॉक टाईम दरमहा कॅशबॅक स्वरूपात मिळण्यासाठी आयडिया ग्राहकांना दरमहा एकूण १०० रुपयांचा रिचार्ज करणे आवश्यक आहे. १२ महिन्यांच्या कालावधीत एकूण ६०० रुपयांचा कॅशबॅक मिळवून यातून टप्प्याटप्प्याने टू-जी ग्राहकांच्या डिव्हाईसचा खर्च भरून निघणार आहे. ३१ जुलै २०१८पर्यंत उपलब्ध असलेली ही ऑफर सर्व जुन्या व नवीन ग्राहकांसाठी मान्य आहे.

या उपक्रमाबाबत बोलताना आयडिया सेल्युलरचे वरीष्ठ विपणन अधिकारी शशी शंकर म्हणाले, ‘भारतातील वाढत चाललेल्या ब्रॉडबॅंडच्या वापरावर आयडियाने लक्ष केंद्रित केले असून, आमच्या मोठ्या संख्याबळाच्या टू-जी ग्राहकांच्या तसेच, भारताच्या ग्रामीण भागातील कनेक्टेड नसलेले ग्राहकांच्या गरजांबाबतही आम्ही जागरूक आहोत. नोकिया फिचर फोन्सवर देण्यात येणार्‍या कॅशबॅक ऑफरच्या माध्यमातून, आम्ही ग्राहकांना किफायतशीरता आणि सहज उपलब्धता या दोन्ही सुविधा देत आहोत.’

नोकिया १०५ हा फोन ९९९ रुपयांना उपलब्ध असून, नोकिया १३० व नोकिया १५० या कॅमेरासहित फोन्सची किंमत अनुक्रमे एक हजार ५९९ रुपये व एक हजार ९५० रुपये आहे. नोकियाच्या फिचर फोन्समध्ये एफएम रेडियो, कॅलक्युलेटर, घड्याळ, दिनदर्शिका, रिमाइंडर्स, फोनबूक आणि फ्लॅशलाइट या फिचर्ससह सक्षम बॅटरी देण्यात येते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link