Next
‘भक्तिरंग’ने ‘विद्या भवन’चे वातावरण भक्तिमय
प्रेस रिलीज
Saturday, September 22 | 10:54 AM
15 0 0
Share this story



पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘भक्तिरंग’ मैफिलीने भारतीय विद्या भवनचे वातावरण भक्तिमय झाले. किराणा घराण्यातील स्वर गायिका सुजाता गुरव यांच्या या मैफिलीला रसिकांनी चांगली दाद दिली.
 
‘विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ५६ वा कार्यक्रम २१ सप्टेंबरला सायंकाळी ‘विद्या भवन’च्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृहात पार पडला. ‘विद्या भवन’चे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले.

सुजाता गुरव यांनी किराणा घराण्याच्या मुलतानी रागाने मैफलीला सुरुवात केली. मुलतानी रागातील ‘ए गोकूलगाव’ ही एकतालावर आधारित आणि द्रुत तालातील ‘नैन में आन बान’ चीज सादर केली. ‘अबीर गुलाल’ यांसह सरस्वती भजन आणि मीरा भजन त्यांनी गायले. ‘युवती मना’ आणि ‘शूरा मी वंदिले’ या नाट्यगीतांचे ही सादरीकरण त्यांनी या वेळी केले.

पंडित नंदीकेश्वर गुरव (तबला), मुकुंद जोशी (ताल), उपेंद्र सहस्त्रबुद्धे (हार्मोनियम), शिवाजी कदम (पखवाज) यांनी साथसंगत केली.

सुजाता गुरव प्रसिद्ध शास्त्रीय गायक, मूळच्या धारवाड येथील पंडित संगमेश्वर गुरव यांच्या कन्या आणि पंडित कैवल्यकुमार गुरव यांच्या त्या बहीण आहेत. जलद तान आणि मुरकी या गाण्याच्या विशेष शैलीसाठी त्या प्रसिद्ध असून, त्याचा प्रत्यय त्यांनी या मैफलीत दिला.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link