Next
‘एमसीई’ सोसायटीतर्फे १४ एप्रिलला अभिवादन मिरवणूक
दहा हजार विद्यार्थी होणार सहभागी
प्रेस रिलीज
Monday, April 08, 2019 | 04:45 PM
15 0 0
Share this article:



पुणे : महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन (एमसीई) सोसायटीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १४ एप्रिल २०१९ रोजी सकाळी ८.३० वाजता अभिवादन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.

मिरवणुकीचे उद्घाटन ‘एमसीई’ सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांच्या हस्ते होईल. संस्थेचे सचिव लतिफ मगदूम मिरवणुकीचे नेतृत्व करणार आहेत. मिरवणुकीचे हे १५ वे वर्ष आहे. संस्थेच्या ३० आस्थापनांतील १० हजार अल्पसंख्याक, सर्वधर्मीय विद्यार्थी, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी मिरवणुकीत सहभागी होणार आहेत.

दरबार ब्रास बॅंडची दोन पथके, ढोल-ताशा यांचा मिरवणुकीत समावेश असेल. राखीव जागांच्या संदर्भात महात्मा गांधी-डॉ. आंबेडकर यांच्यातील ‘पुणे करार’ हा जिवंत देखावा या मिरवणुकीत सादर केला जाणार आहे. आझम कॅंपस येथून मिरवणुकीस प्रारंभ होऊन पुना कॉलेज, गोल्डन ज्युबिली, जुना मोटार स्टँड, पद्मजी पोलीस चौकी, भारत सिनेमा, ए. डी. कॅम्प चौक, मॉडर्न बेकरी चौक, संत नरपतगिरी चौक, वीज वितरण कार्यालय, जिल्हा परिषद, मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथील डॉ. आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीची सांगता होईल.

‘अवामी महाज’ या सामाजिक संघटनेतर्फे या ठिकाणी मोफत पाणपोई आणि सरबत वाटप केले जाईल. दर वर्षी ‘एमसीई’ संस्थेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महंमद पैगंबर यांच्या जयंतीदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी भव्य मिरवणुका काढल्या जातात; तसेच या महामानवांचे सामाजिक, शैक्षणिक संदेश प्रसारित केले जातात.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search