Next
‘क्विक हील’तर्फे ग्राहकांसाठी स्पर्धा
प्रेस रिलीज
Thursday, March 22, 2018 | 12:39 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : क्विक हील टेक्नॉलॉजी लिमिटेड या आयटी सुरक्षा सोल्यूशन्सच्या अग्रगण्य प्रदात्यांपैकी कंपनीने तमिळनाडू वगळता संपूर्ण देशभरात आपल्या ग्राहकांसाठी ‘क्विक हील खरिदो दुनिया देखो’ स्पर्धा सुरू करण्याची घोषणा केली.

क्विक हीलच्या पोर्टफोलिओशी निगडीत असलेले ‘क्विक हील टोटल सिक्युरिटी’, ‘क्विक हील इंटरनेट सिक्युरिटी’, ‘क्विक हील अँटिव्हायरस प्रो’ असे कोणतेही उत्पादन ग्राहकांनी विकत घेतल्यास त्यांना पॅरिस, हाँगकाँग किंवा दुबईसाठी विनामूल्य टूर जिंकण्याची संधी मिळेल. या उपक्रमाचा भाग म्हणून ‘क्विक हील’ प्रत्येक आठवड्यात दोन भाग्यवान विजेते घोषित करेल आणि त्यांना त्यांच्या स्वप्नातील स्थळी जाण्याची संधी उपलब्ध करून देईल. याव्यतिरिक्त या स्पर्धेत ग्राहकांना प्रत्येक खरेदीनंतर निश्चित भेटवस्तूही मिळवता येणार आहे.

‘क्विक हील खरीदो दुनिया देखो’ स्पर्धा ही बळकट आयटी सेक्युरिटी सोल्यूशन्सच्या वाढीचा विचार करणाऱ्या ‘क्विक हील’च्या व्यापक धोरणाचा एक भाग आहे. डिव्हाइसवर असलेला महत्त्वाचा वैयक्तिक डेटा सायबर क्रिमिनल्सपासून सुरक्षित ठेवण्यास ती मदत करते. क्विक हील सिक्युरिटी लॅबच्या वार्षिक धोका अहवालानुसार (थ्रेट रिपोर्ट) २०१७मध्ये ९३० दशलक्ष मालवेअर आढळले असून, २०१६च्या तुलनेत ‘रैनसमवेअर’ची ३०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. अहवालाने हे अधोरेखित केले की, प्रगत तंत्रज्ञानाने युझर्सची सिस्टीम हॅक करून, आर्थिक लाभ करून घेण्यात सायबर क्रिमिनल्स तरबेज होत चाललेत. डिजिटायझेशन आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनला आहे त्यानिमित्ताने आपल्या डिजिटल असेट्सचे संरक्षण करण्यासाठी ग्राहकांनी स्वयंप्रेरित दृष्टिकोन बाळगला पाहिजे, यावर अहवालाने जोर दिला आहे.

क्विक हील टेक्नॉलॉजीजचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर कैलाश काटकर म्हणाले की, ‘ही स्पर्धा म्हणजे ‘क्विक हील’ने ऑफर केलेली अत्यंत उपयुक्त आणि ग्राहकांशी सखोल नाते निर्माण करणारी आहे. जलद इंटरनेट कनेक्टिव्हिटीमुळे सायबर क्राइम एक कठोर वास्तविकता बनली आहे. डिजिटल उपकरणांवर ग्राहकांच्या डेटाच्या असुरक्षिततेचा धोका वाढतो आहे. या स्पर्धेद्वारे आमचे ध्येय आहे ते ग्राहकांपर्यंत पोहोचणे आणि ‘क्विक हील’ उत्पादन विकत घेताना येणाऱ्या अनुभवातून, आयटी सिक्युरिटी सोल्युशन्सच्या मजबुतीकरणासाठी उपाययोजनाबाबत त्यांना जागरूक करणे.’

आयटी सिक्युरिटी सोल्यूशन्सच्या व्यापक जागरूकतेस प्रोत्साहन देण्यासाठी आणि ग्राहकांमध्ये एक सवय निर्माण करण्यासाठी, ‘क्विक हील’ने अत्यंत सोपे व सोयीस्कर नियम ठेवले आहेत. आपल्या आवडीचे ‘क्विक हील’ उत्पादन विकत घ्या. www.quickheal.co.in/ contest या संकेत स्थळाला भेट देऊन अॅक्टिवेट करा. स्पर्धेच्या पानावर दिलेला नोंदणी फॉर्म भरा आणि ‘सबमिट’वर क्लिक करा.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search