Next
अहमदनगरमध्ये रंगणार कथाकथन, काव्यवाचन स्पर्धा
बॅकस्टेज आर्टिस्टस असोसिएशनचा वार्षिक उपक्रम
BOI
Tuesday, July 02, 2019 | 02:52 PM
15 0 0
Share this article:

अहमदनगर : ‘अहमदनगर बॅकस्टेज आर्टिस्टस असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या स्व. सेठ श्यामसुंदरजी बिहाणी (बंगडीवाला) स्मृती राज्यस्तरीय आंतरशालेय कथाकथन आणि स्व. मनीष कुलकर्णी राज्यस्तरीय खुल्या स्वलिखीत काव्यवाचन स्पर्धा येत्या २० आणि २१ जुलै रोजी होणार आहेत,’ अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष व प्रसिद्ध अभिनेते मिलींद शिंदे यांनी दिली.

‘कथाकथन स्पर्धेचे हे सलग १८ वे वर्ष असून, भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल येथे शनिवारी, २० जुलै रोजी सकाळी १२ वाजता या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. इयत्ता पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा दोन गटांमध्ये ही स्पर्धा होणार असून, दोन्ही गटांमध्ये विविध पारितोषिकासह सांघिक करंडक देण्यात येणार आहे. कथाकथन स्पर्धेसाठी प्रवेशिका स्वीकारण्याची अंतिम मुदत  बुधवार, १७ जुलै, संध्याकाळी सात वाजेपर्यंत आहे. स्व. मनीष कुलकर्णी राज्यस्तरीय खुल्या स्वलिखित काव्यवाचन स्पर्धा रविवारी, २१ जुलै रोजी रावसाहेब पटवर्धन सभागृह येथे सकाळी दहा वाजता होणार असून, या स्पर्धेसाठी प्रवेशिका स्वीकारण्याची अंतिम मुदत  शनिवार, २० जुलै रोजी संध्याकाळी सात वाजेपर्यंत आहे. दोन्ही स्पर्धांचे परितोषिक वितरण २१ जुलै रोजी सायंकाळी ६:३० वाजता प्रसिद्ध अभिनेते माधव अभ्यंकर याच्या हस्ते होणार आहे,’ अशी माहिती प्रसिद्ध साऊंड इंजिनियर कामोद खराडे यांनी दिली. 

या स्पर्धेच्या प्रवेशिका यज्ञ मेडिकल, होशिंग हॉस्पिटलसमोर व अमृतेश्वर किराणा स्टोअर्स, पाईपलाईन रोड येथे उपलब्ध आहेत.

अधिक माहितीसाठी संपर्क :
अमित काळे : ९४२२२ २४८८४ 
सागर जोशी : ८८०५६ ७४१४१ 
संतोष बडे : ९८२३३ ८५१५६  
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search