Next
रत्नागिरीत घाणेकर स्मृती करंडक स्पर्धा
BOI
Tuesday, December 26, 2017 | 03:52 PM
15 0 0
Share this story

रत्नागिरी : नगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या येथील शाखेतर्फे ‘नटवर्य कै. शंकर घाणेकर स्मृती करंडक २०१८’ या राज्यस्तरीय खुल्या मराठी एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा १७ ते १९ जानेवारी २०१८ या कालावधीत येथील स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात होतील.

यात प्रथम येणाऱ्या २५ संघाना प्रधानान्ये प्रवेश दिला जाणार असून, ५०० रुपये प्रवेश शुल्क आणि ५०० रुपये अनामत रक्कम रोख अथवा धनादेश संस्थेच्या पत्त्यावर पाठवायचा आहे. प्रवेशिका पाठविण्याची शेवटची तारीख ३० डिसेंबर २०१७ आहे. एकांकिका सादर करण्यासाठी ४५ मिनिटांचा तसेच स्टेज लावणे व काढण्यासाठी प्रत्येकी १५ मिनिटे देण्यात येतील. सहभागी संघाला सादरीकरणानंतर एक हजार ५०० रुपयांचे मानधन दिले जाईल.  

स्पर्धेसाठी विविध प्रकारांत पारितोषिके दिली जाणार आहेत. सर्वोत्कृष्ट एकांकिकेसाठी २५ हजार, १५ हजार, १० हजार (अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय) रुपये, उत्तेजनार्थ सात हजार आणि प्रत्येकी स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र दिले जाईल. उत्कृष्ट अभिनय स्त्री व पुरुषसाठी एक हजार ५००, एक हजार, ७००, उत्तेजनार्थ ५०० आणि प्रत्येकी स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र दिले जाईल. उत्कृष्ट दिग्दर्शनासाठी, उत्कृष्ट संगीतासाठी, उत्कृष्ट प्रकशयोजनेसाठी एक हजार ५००, एक हजार, ७००, उत्तेजनार्थ ५०० आणि प्रत्येकी स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र दिले जाईल. उत्कृष्ट लेखनासाठी प्रथम दोन क्रमांकाना एक हजार ५००, एक हजार याबरोबरच प्रत्येकी स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र दिले जाईल.

स्पर्धेविषयी :

दिवस : १७ ते १९ जानेवारी २०१८
स्थळ : स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृह, मारुती मंदिर, रत्नागिरी.

संस्थेचा पत्ता : अ.भा.म.ना.प. शाखा रत्नागिरी द्वारा विजय शांताराम साळवी, ‘सुशांत’ ६७१/जी, हिंदू कॉलनी, मारुती मंदिर, रत्नागिरी ४१५ ६१२
ई-मेल : abmnp.rtg@gmail.com
अधिक माहितीसाठी संपर्क : विजय साळवी (९९२२३ ९६३१४), घनश्याम मगदूम (९९७५७ २६०१५)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link