Next
खर्डी येथे शिवराज ग्रुपतर्फे रक्तदान शिबिर
BOI
Monday, February 18, 2019 | 01:19 PM
15 0 0
Share this article:



सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथे शिवराज ग्रुपच्या वतीने १७ फेब्रुवारी २०१९ रोजी सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळ्याला प्रारंभ करण्यात आला. या निमित्ताने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिर व क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन गोपाळपूर येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅंड रिसर्च इन्स्टिट्यूटचे (स्वेरी) विश्वस्त प्रा. सुरज रोंगे यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन विश्वस्त प्रा. रोंगे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्यांनी सध्याच्या युवकांना मार्गदर्शनाची गरज असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘या उपक्रमात मी आनंदाने व अधिक उत्साहाने सहभागी होत असून, सध्याचे युवक विधायक उपक्रम राबवीत असल्याची बाब समाधान देणारी आहे. आपल्या घरातील आई, वडील व घरातील जेष्ठ नागरिक कामावर गेलेले असताना घरातील मुलांना नेमके काय केले, तर त्याचा त्यांना कसा फायदा होईल, जीवनाच्या फायद्याच्या दृष्टीने नेमके काय करावे, हेच माहित नसते. त्यामुळे या ग्रुपच्या माध्यमातून योग्य संस्कार आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यानंतर युवकांना एक निश्चित दिशा मिळेल. आत्तापर्यंत ग्रुपमुळे योग्य दिशा व योग्य संस्कार मिळाले असून, यापुढेही शिवराज ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी आपले कार्य अखंडीत ठेवावे.’

या प्रसंगी विश्वस्त प्रा. रोंगे यांनी क्रिकेट सामन्याच्या उद्घाटनावेळी उत्कृष्ट फलंदाजी करून महाविद्यालयीन जीवनातील क्रिकेटच्या खेळाबाबतच्या आठवणी सांगितल्या. या वेळी त्यांनी स्वतःही रक्तदान केले. या कार्यक्रमाला प्रसंगी आबासाहेब रोंगे-पाटील, भारत पाटील, शरद रोंगे-पाटील, सचिन रोंगे, प्रकाश जाधव, राहुल रोंगे, अमोल पवार, संतोष मोरे, मोहन रोंगे, समाधान रोंगे, सीताराम रोंगे, महेंद्र रोंगे, प्रशांत रोंगे, निरंजन खंडागळे, स्वप्नील रोंगे-पाटील, दीपक पाटील, युवराज रोंगे, आप्पासाहेब रोंगे, सुरेश कुसमुडे, योगेश पाटील, विकास पाटील, भारत रोंगे, दत्तात्रय येडगे, ज्योतिराम दिघे, गणेश जाधव, श्रीकांत रोंगे, सचिन चव्हाण, गणेश शिनगारे, ग्रुपच्या सदस्यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search