Next
डॉ. संतोष ढगे यांना रौप्यपदक
प्रेस रिलीज
Wednesday, April 25 | 02:09 PM
15 0 0
Share this story

काठमांडू (नेपाळ) येथे झालेल्या १२ व्या जागतिक आयुर्वेदिक कॉन्फरन्समध्ये शोधनिबंध सादरीकरणाचे रौप्यपदक मान्यवरांच्या हस्ते स्वीकारताना डॉ. संतोष ढगेपुणे : काठमांडू (नेपाळ) येथे १२ व्या जागतिक आयुर्वेदिक कॉन्फरन्समध्ये उत्तम शोधनिबंध सादरीकरणाचे रौप्यपदक डॉ. संतोष ढगेंना मिळाले. नेपाळचे माजी गृहमंत्री दीपक बस्कोटा यांच्या हस्ते व जर्मनीचे डॉ. लोथार प्रिक आणि हॉलंडचे डॉ. किंग्जले ब्रुक्स् यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. ढगे यांना प्रदान करण्यात आले.

महर्षी वेदिक फाउंडेशन नेपाळ, सर्बियन असोसिएशन ऑफ आयुर्वेद, युरोप आणि वनौषधी विदयापीठ, भारत यांनी संयुक्तरित्या ही जागतिक कॉन्फरन्स नुकतीच नेपाळ येथे आयोजित केली होती. या कॉन्फरन्समध्ये सहभागी होण्यासाठी भारत, जर्मनी, नेदरलॅंड, सर्बिया, नेपाळ देशांमधील निवडक १०० निमंत्रित तज्ञ उपस्थित होते. यातील तज्ञांनी आपले शोध निबंध त्याठिकाणी सादर केले.

डॉ. ढगे हे सुप्रसिद्ध आयुर्वेदिक हद्यरोगतज्ञ म्हणून नावाजले जातात. ते पुणे आणि चिपळूण येथे रुग्ण तपासणी करतात. या कॉन्फरन्समध्ये त्यांनी त्यांचा हातखंडा असलेल्या ‘नॅचरल बायपास थेरपी- वंडरफूल नॉनईन्वह्रॅसिव्ह (बिना शस्त्रक्रिया) ट्रिटमेंट फॉर हार्ट ब्लॉकेजेस्’ या विषयावर ३० मिनिटांचे लेक्चर देऊन शोधनिबंध सादर केला.

या लेक्चरमध्ये डॉ. ढगेंनी आयुर्वेदानुसार आणि आधुनिक शास्त्रानुसार हृद्याच्या रक्तवाहिनीमध्ये ब्लॉकेजेस् कसे तयार होतात, नॅचरल बायपास थेरपी म्हणजे काय, हे  सविस्तर सांगितले. ‘ढगे हेल्थकेअर’मध्ये केल्या जाणाऱ्या आयुर्वेदिक उपचारांचा फायदा कसा होतो हे संशोधन आणि वैदयकिय क्षेत्रातील गोल्ड स्टॅंडर्डसचा आधार घेऊन प्रभावीपणे मांडले, हे सांगताना त्यांनी काही रुग्णांची उदाहरणे दिली. त्यामध्ये त्यांनी रुग्णांच्या लक्षणांमध्ये कसा फरक पडला, त्यांच्या रिपोर्टस्मध्ये कसे बदल घडत गेले हेही सांगितले.

या आयुर्वेदिक उपचारांनी रुग्णांना लगेच आणि दीर्घकाळ आराम मिळतो हे ही काही रुग्णांची उदाहणे देऊन सांगितले. आजअखेर एक हजार पेक्षाही अधिक रुग्णांनी या उपचारांचा लाभ घेतला आहे. हा अवघड विषय सोप्या भाषेत प्रभावीपणे मांडल्याने डॉ. ढगेंना सिल्व्हर मेडल प्रदान करण्यात आले.

या कॉन्फरन्समध्ये जर्मनीचे डॉ. लोथार प्रिक, सर्बियाचे डॉ. ब्रॅंको सिसिक, हॉलंडचे डॉ. किंग्जले ब्रुक्स, डॉ. बर्नार्ड मिशेल, नेपाळचे डॉ. रामेश्वर कोईराला, डॉ. विवेकानंद संहिता शास्त्री तसेच डॉ. जॉन हेग्लीन, डॉ. फेगट्रॅवीस, डॉ. संदीप दवेल, डॉ. सतीश शिंदाडकर आदींनी आपले शोधनिबंध सादर केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link