Next
तुम्हालाही पूरग्रस्तांना मदत करायचीय? असे आहेत पर्याय...
BOI
Saturday, August 10, 2019 | 05:26 PM
15 0 0
Share this article:पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी सरकारी यंत्रणांसह राज्याच्या विविध भागांतील खासगी संस्था, संघटनांनीही युद्धपातळीवर कार्य सुरू केले आहे. त्यात राज्यातील नागरिकांनाही सहभागी होता येईल. त्यापैकी काही पर्यायांची माहिती येथे देत आहोत.
...........
मुख्यमंत्री सहायता निधी
कोल्हापूर, सांगली पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीच्या बँक खात्यात थेट मदत जमा करता येईल. त्याचे तपशील असे आहेत. (हे तपशील सरकारकडून जाहीर करण्यात आले आहेत.)

बँक खाते क्रमांक - 10972433751
स्टेट बँक ऑफ इंडिया, मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई - ४००००१ 
आयएफएससी : SBIN0000300
.........
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यासाठी मदत कक्ष सुरू करण्यात आले आहेत. तेथील संपर्क क्रमांकांवर संपर्क साधून आपण मदत पोहोचवू शकता.

सांगली जिल्ह्यासाठीचा मदत कक्ष - समन्वय अधिकारी
भारत वाघमारे (उपजिल्हाधिकारी) - ९८५०७ ९११११
सुरेखा माने (उपजिल्हाधिकारी) - ७७७५९ ०५३१५
रवी कोळगे - ९५११२ ५१४७५ 

कोल्हापूर जिल्ह्यासाठीचा मदत कक्ष - समन्वय अधिकारी
अजय पवार (उपजिल्हाधिकारी) - ८८५६८ ०१७०८
आरती भोसले (उपजिल्हाधिकारी) - ९८२२३ ३२२९८
नीता शिंदे (उपजिल्हाधिकारी) - ९४२११ १८४४६
....................

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ - जनकल्याण समिती, पुणे
ई-मेल : rssjankalyan@yahoo.co.in
मोबाइल : ९०११७ ००८२३
बचत खाते क्रमांक : 20057103852
बँक ऑफ महाराष्ट्र, टिळक रोड शाखा, पुणे 
आयएफएससी : MAHB0000041

सध्या आर्थिक मदतीचीच अपेक्षा असून, चेक द्यायचे असल्यास “रा. स्व. संघ जनकल्याण समिती” या नावाने काढावेत. दोन हजार रुपयांपर्यंत रोख रक्कम जमा करता येईल.  मदतीला आयकर नियम ८० जी अंतर्गत सूट आहे, अशी माहिती रा. स्व. संघाच्या पुणे जनकल्याण समितीचे (महाराष्ट्र प्रांत) कार्यवाह तुकाराम नाईक यांनी दिली आहे.
.............
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ - जनकल्याण समिती, कोल्हापूर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोल्हापुरातील जनकल्याण समितीतर्फे पूरग्रस्तांच्या पाच ते सहा तात्पुरत्या निवारा केंद्रांवर भोजन, औषधे, शुद्ध पाणी आणि आरोग्य सेवा देण्याचे काम सुरू आहे. पूर ओसरल्यानंतर किमान एक हजार पूरग्रस्त कुटुंबांना धान्य, औषधे, जंतुनाशके, साबण, गरजेचे कपडे अशा आवश्यक वस्तूंचे किट देण्याचे ठरवण्यात आले आहे. सर्वांनी या कार्याला वस्तूरूपाने किंवा देणगीरूपाने मदत करावी, असे आवाहन कोल्हापूर जनकल्याण समितीचे कार्यवाह विनायक कुलकर्णी (९४२२० ३४५००) आणि जनकल्याण समितीच्या आपत्ती निवारण निधीचे प्रमुख केशव गोवेकर (९३७३६ ५५७७७) यांनी केले आहे. 

बँक खात्याचे तपशील 
आरएसएस जनकल्याण समिती, कोल्हापूर
बँक ऑफ महाराष्ट्र, न्यू महाद्वार शाखा, खरी कॉर्नर, कोल्हापूर
बचत खाते क्रमांक : 60025310280
आयएफएससी : MAHB0000326

कोणाला वस्तूंचे किट द्यायचे असल्यास किटचा तपशील - पाच किलो तांदूळ, दोन किलो गहू पीठ, एक लिटर तेल, फोडणीचे साहित्य, दोन टॉवेल, एक चटई, एक मेडिक्लोर बाटली, एक फिनेल बाटली, एक टूथपेस्ट, एक डेटॉल बाटली, आंघोळीसाठी कपडे, भांड्यांचा साबण, सहा मेणबत्त्या, एक काड्यापेटी, खराटा, बादली, मग, ओडोमॉस, तुरटी
..........
पूरग्रस्तांसाठी बेलापुरातही विभागीय मदत कक्ष सुरू

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील निवारा कॅम्पमधील पूरग्रस्तांना तत्काळ मदत उपलब्ध करून देण्यासाठी कोकण विभागीय मदत कक्षाचे उद्घाटन ११ ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता बचत भवन, सी. बी. डी. बेलापूर येथे होणार आहे. येथे जमा झालेल्या वस्तू सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वाहनाने  पाठवण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त शिवाजीराव दौंड यांनी दिली आहे. पूर परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांना मदत देऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी विभागीय मदत कक्षामध्ये आपली वस्तू स्वरूपातील मदत जमा करावी, असे आवाहन दौंड यांनी केले आहे. 

पूरग्रस्तांसाठी मदत करू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी कार्यालयीन वेळेत या कक्षात वस्तू स्वरूपात मदत जमा करावयाची आहे. यामध्ये ब्लँकेट्स, सतरंजी, लहान मुलांचे कपडे, साड्या, टॉवेल, महिलांसाठी किट (साडी, परकर, टॉवेल, सॅनिटरी नॅपकिन इत्यादी), तसेच पुरुषांसाठी किट (टी-शर्ट, बर्मुडा, स्वेटर इत्यादी), लहान मुले व मुलींसाठी किट (टॉप, चड्ड्या, शॉर्टस्, कानटोपी, स्वेटर) स्वीकारले जातील. परंतु केवळ नवीन कपडे स्वीकारले जातील. जुने कपडे देऊ नयेत. याबरोबरच टिकाऊ अन्नपदार्थ म्हणजेच बिस्किटांचे पुडे, सीलबंद खाण्याची पाकिटे, मॅगी, चहा पावडर, भडंग-मुरमुरे, ओआरएस, मेडिक्लोर, टूथपेस्ट-टूथब्रश, दंतमंजन, साबण, खोबरेल तेल, कंगवा, सॉक्स, स्लिपर, मिनरल वॉटर बॉटल, हेल्थ ड्रिंक, मेणबत्ती-काड्यापेटी, मच्छर अगरबत्ती, पत्रावळी, टॉर्च अशा वस्तू स्वीकारल्या जातील. त्याचबरोबर साखर-मीठ, बेसन, गोडतेल, पीठ, तांदूळ, डाळी, कडधान्य अशा स्वरूपाचा किराणा माल देखील स्वीकारला जाणार आहे.

पुरवठा शाखेचे उपायुक्त शिवाजी कादबाने यांच्या नेतृत्वाखाली प्रांत अधिकारी (पनवेल) दत्तात्रय नवले आणि तहसीलदार (पनवेल) अमित सानप, निवासी तहसीलदार संदीप चव्हाण हे काम पाहणार आहेत. उपायुक्त (महसूल) सिद्धराम सालिमठ यांच्या नियंत्रणाखाली हा कक्ष सुरू राहणार आहे.
..........
रत्नागिरीत वस्तू संकलन
रत्नागिरीतील रत्नदुर्ग माउंटेनीअर्स आणि शिरगाव येथील फिशरीज कॉलेज यांच्या वतीने पूरग्रस्तांसाठी वस्तूंचे संकलन करण्यात येत आहे. रविवारीही (११ ऑगस्ट) सकाळी १० ते दुपारी दोन या वेळेत हे संकलन केले जाणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात हे संकलन केले जात आहे.

ड्रायफ्रूट्स, केक, बिस्किटे, तांदूळ, डाळी, गव्हाचे पीठ, तेल, कांदे, बटाटे, साखर, चहा पावडर, मीठ, मसाले, जुने-नवीन चांगल्या स्थितीतील कपडे, सॅनिटरी नॅपकिन्स, टॉवेल/नॅपकिन्स, बेबी फूड, मिनरल वॉटर, डायपर्स, सर्दी-तापावरील प्राथमिक औषधे, लहान मुलांचे कपडे, काड्यापेट्या आणि मेणबत्ती, अंथरूण-पांघरूण, पाणी निर्जंतुक करण्याची औषधे, टूथपेस्ट, टूथब्रश, साबण, इत्यादी वस्तू येथे जमा कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

संपर्क : 
प्रांजली चोप्रा - ९१४६१ २०१२४
अमित कोकाटे - ९४०४७ ०५६११
गणेश चौघुले - ९०८२१ ०७८०१
..........
रत्नागिरी मदत ग्रुप

रत्नागिरीतील रत्नागिरी मदत ग्रुपतर्फेही पूरग्रस्तांसाठी वस्तूंचे संकलन केले जात असून, खालील क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

रत्नागिरी - शुभम कीर - ९०२१० ३६८०३, 
नीलेश आखाडे - ९८६०६ २५७४०, 
प्रथमेश वायंगणकर - ८९९९५ ६२०४५

साखरतर-जाकादेवी - 
शुभम पवार - ९४४९० ७९५२८

देवरुख - 
प्रकाश शिंदे - ८१४९८ ०३०३३

खालील शीर्षकांवर क्लिक करून, अधिक माहिती घेऊन आपण आपली मदत तेथेही पोहोचवू शकता.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search