Next
बालरंगभूमी समृद्ध करण्याचा निर्धार
प्रेस रिलीज
Wednesday, March 21, 2018 | 03:31 PM
15 0 0
Share this article:

जागतिक बालरंगभूमी दिनानिमित्त आयोजित परिसंवादात नाट्यसंस्कार कला अकादमीचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी, शुभांगी दामले, धनंजय सरदेशपांडे व प्रमोद काळे सहभागी झाले होते.

पुणे : ‘हसत खेळत मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास घडवण्यात नाटके मोलाची ठरतात. त्यामुळे बालरंगभूमी सर्वांगीणदृष्टीने समृद्ध करण्याचा निर्धार सर्वांनी केला पाहिजे’, असे आवाहन पारखी यांनी केले. नाट्यसंस्कार कला अकादमीच्या वतीने जागतिक बालरंगभूमी दिनानिमित्त ‘बालरंगभूमी, पालक आणि शिक्षक’ या विषयीवरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी नाट्यसंस्कार कला अकादमीचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी, अभिनेत्री व निर्मात्या शुभांगी दामले, नाट्यलेखक धनंजय सरदेशपांडे आणि नाट्य प्रशिक्षक प्रमोद काळे उपस्थित होते. सद्यस्थितीतील बालरंगभूमी, बालकलाकार, पालक आणि शिक्षक यांच्यासमोरील आव्हाने आदी विविध विषयांवर या वेळी चर्चा करण्यात आली.  

या वेळी शुभांगी दामले म्हणाल्या, ‘लहान मुलांच्या समस्या काय आहेत? त्यांच्या भावविश्वात काय घडामोडी घडत असतात, बालप्रेक्षकांना कोणते विषय आवडतील आणि त्यांचं प्रबोधन नाटकांतून कसे होईल, यावर जास्त भर दिला गेला पाहिजे. ग्रीप्सच्या माध्यमातून अनेक वेगवेगळे विषय कशापध्दतीने सादर केले जातात हेदेखील दामले यांनी पालकांना उलगडून दाखविले.

प्रकाश पारखी म्हणाले, ‘मुळात मुलांना नाट्यप्रशिक्षण देणे एवढाच हेतू न ठेवता त्यांना व्यासपीठ आणि रंगमंच उपलब्ध करून देत त्याद्वारे सभाधीटपणा,आत्मविश्वास, पाठांतर, शिस्त, प्रसंगावधान, समयसूचकता, एकत्रितपणे काम करताना एकमेकाला सांभाळून घेणे या गोष्टी रुजवल्या जातात. नाट्यप्रशिक्षण हे व्यक्तिमत्त्व विकासाचे साधन आहे हे या प्रशिक्षणात होणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमांद्वारा मुलांना आपला आपण विचार करणे, तो योग्य पद्धतीने इतरांपर्यंत पोचवणे, आपल्या व इतरांच्या भावनांचे  स्वरूप ओळखणे व त्याला योग्य तो प्रतिसाद देणे, योग्य शब्द योजना करणे अशा अनेक गोष्टी शिकता येतात. त्यांच्यामुळे मुलांचा कायिक, वाचिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक अशा सर्व पातळ्यांवर विकास होतो. एकाग्रता वाढल्याने शालेय अभ्यासातही फायदा होतो. एकूणातच हसत खेळत मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास घडवण्यात नाटके मोलाची ठरतात.’ 

प्रमोद काळे म्हणाले, ‘शाळेतील नाट्य विषयाचा शिक्षकांना इतर विषयातील शिक्षक वेगळ्या अथवा तुच्छ नजरेने पाहतात. नाटकं करुन पुढे करियर करता येईल का?असा प्रश्न इतर विषयातील शिक्षक आणि पालकांना नेहमी पडत असतो. कल्पनाशक्तीच्या आणि सर्जनशिलतेच्या जोरावर मात्र नाटकातील विद्यार्थी पुढे गेल्याचं पाहिल्यावर मात्र आपण नाटक विषयाचे शिक्षक असल्याचे धन्य वाटते.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search