Next
‘महिंद्रा फायनान्स’ने मुदत ठेवींचे दर वाढवले
प्रेस रिलीज
Tuesday, June 19, 2018 | 01:55 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ग्रामीण आणि निमशहरी भागातील बाजारपेठेमध्ये कार्यरत असणाऱ्या ‘महिंद्रा फायनान्स’ या नॉन बॅंकिंग अर्थपुरवठादार कंपनीने आपल्या मुदतठेवींच्या व्याजदारात वाढ करीत असल्याची घोषणा केली आहे. कागदरहित आणि गुंतवणूकदारांच्या सोयीच्या व्यवहारासाठी या कंपनीतर्फे ऑनलाइन गुंतवणूक करणाऱ्या ठेवीदारांना ०.२५ टक्के अधिक व्याज देण्यात येणार आहेत.

कंपनीच्या या निर्णयामुळे ऑनलाइन मुदत ठेव गुंतवणूकदारांना दसादशे ८.७५ टक्के व्याज दर ऑफलाइन मुदत ठेव गुंतवणूकदारांना ८.५ टक्के व्याज मिळणार आहे.

मुदतठेवींच्या दरांमधील वृद्धीबाबत ‘महिंद्रा फायनान्स’चे कार्यकारी संचालक आणि मुख्य वित्तीय अधिकारी व्ही. रवी म्हणाले, ‘मुदतठेवीचा प्रकार हा गुंतवणूदारांसाठी नेहमीच ‘एव्हरनग्रीन’ मानला गेला असून, बहुतेक सर्व गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये त्याला स्थान असते. त्यामुळे आम्ही गुंतवणूकदारांसाठी हा आकर्षक गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध करीत आहोत. ऑनलाइन गुंतवणूक करून गुंतवणूकदार अधिक व्याजदराचा लाभ घेतील, याची आम्हाला खात्री आहे.’

महिंद्रा अॅंड महिंद्रा वित्तीय सर्व्हिसेस लिमिटेड (महिंद्रा फायनान्स) ही महिंद्रा ग्रुपची विनाबॅंकिंग वित्तीय कंपनी आहे. या कंपनीचे ग्रामीण आणि निमशहरी भागामध्ये काम चालते. या कंपनीचे ५० लाख ३० हजार एवढे ग्राहक असून, ‘एयूएम’ (असेस्ट्स अंडर मॅनेजमेंट) ८.४९ अब्ज डॉलर एवढा आहे. ही कंपनी प्रामुख्याने विविध प्रकारची वाहने आणि ट्रॅक्टरच्या खरेदीदारांना अर्थपुरवठा करते, मुदतठेवींवर आकर्षक व्याज देते, तसेच ‘एसएमई’जना कर्जपुरवठाही करते. या कंपनीची देशभरात एक हजार २८९ कार्यालये आहेत.

‘महिंद्रा फायनान्स’ ही भारतामधील एकमेव विनाबॅंकिंग वित्तीय गटामधील अशी कंपनी आहे जी बाजारपेठेमधील ‘डो जोन्स सस्टेनॅबिलिटी इंडेक्स’वर नोंदणीकृत कंपनी आहे. तसेच ‘Great Place to Work® Institute India’ या संस्थेने ही कंपनी भारतामधील ‘बीएफएसआय’ गटामधील सर्वोत्कृष्ट १५ कंपन्यांमध्ये समाविष्ट असल्याचे स्पष्ट केले आहे. ‘द इकॉनॉमिक टाइम्स’ या वृत्तपत्राने या कंपनीचा ‘एवन बेस्ट इम्प्लयर २०१७’ आणि ‘बेस्ट बीएफएसआय ब्रॅंड २०१८’ असा गौरव केला आहे.

गुंतवणुकीचा लाभ घेण्यासाठी वेबसाइट : https://fixeddeposit.mahindrafinance.com
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link