Next
‘एओ स्मिथ’तर्फे महाराष्ट्रात ग्रीन सिरिज वॉटर प्युरिफायर्स
प्रेस रिलीज
Tuesday, April 24 | 01:01 PM
15 0 0
Share this story

एओ स्मिथ इंडियाच्या ग्रीन आरओ वॉटर प्युरिफायरसोबत पराग कुळकर्णीपुणे : वॉटर हिटर क्षेत्रातील आपली आघाडी पुन्हा मिळवल्यानंतर एओ स्मिथने वॉटर प्युरिफायर क्षेत्रातील आघाडी टिकवण्याच्या उद्देशाने ग्रीन आरओ वॉटर प्युरिफायरची सुरूवात महाराष्ट्रातील बाजारपेठेत केली आहे.

अॅडव्हान्स रिकव्हरी टेक्नॉलॉजीयुक्त (एआरटी) असे हे अत्याधुनिक उत्पादन असून, यामुळे साधारण आरओ प्युरिफायरच्या तुलनेत दुप्पट पाण्याची बचत होते. पहिल्या टप्प्यात हे उत्पादन आघाडीच्या ३२ शहरांत सुरू करण्यात येत असून, नंतर लवकरच हे उत्पादन टिअर दोन शहरांत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

वॉटर प्युरिफिकेशन तंत्रज्ञानातील अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एओ स्मिथ इंडियाची ही ग्रीन वॉटर प्युरिफायर्स डबल प्रोटेक्शनने युक्त आहेतच; पण त्याचबरोबर यांत ‘एससीएमटी’सहित (सिल्व्हर चार्ज्ड मेंब्रेन टेक्नॉलॉजी) आठ स्टेज प्युरिफिकेशन असल्याने यातून अतिशय शुद्ध पाणी मिळते जे लहान मुलांनाही सुरक्षित आहे. त्याचबरोबर यामध्ये मिनरलायझर तंत्रज्ञान उपलब्ध असल्याने पाण्यात आवश्यक घटक हे एक बटण दाबताच मिसळले जातात.  

ही रेंज एक वर्षाच्या सर्वसमावेशक अशा वॉरंटीने युक्त आहे. यामध्ये फिल्टर्स आणि आरओ मेंब्रेनचा ही समावेश आहे. परिणामी ग्राहकांसाठी चिंतामुक्त, असे हे उत्पादन आहे. त्याचबरोबर ‘एओ स्मिथ’ची महत्त्वपूर्ण अशी ‘पॉवर ऑफ १’ एक तासात प्रतिसाद, एका दिवसात समस्यांचे निराकरण आणि एकाच वेळेत पूर्ण करण्याचे वचनही यामध्ये देण्यात आले आहे.

याविषयी बोलताना एओ स्मिथ इंडिया वॉटर प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक पराग कुळकर्णी म्हणाले, ‘एओ स्मिथची ग्रीन सिरीज ही या विभागातील सर्वांत चांगली श्रेणी असून, भारतातील अन्य आरओ प्युरिफायर्सच्या तुलनेत ‘एओ स्मिथ’ची ग्रीन आरओ सिरीज ही सर्वाधिक पाणी मिळवते. माझा विश्वास आहे, की आजचे ग्राहक हे पर्यावरणाचा विचार करतात आणि ते नक्कीच पाणी वाचवणाऱ्या या नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करतील. देशांत आरओ वॉटर प्युरिफायर हा विभाग वाढता आहे आणि आम्ही सातत्याने या विभागात आमचे वितरण आणि पोहोच वाढवत राहू. बाजारपेठेत वॉटर प्युरिफायर्स ना अधिक स्पर्धेला जरी तोंड द्यावे लागत असले तरीही आमच्या सेवा, तंत्रज्ञानआणि गुणवत्तेमुळे आम्ही वरचढ ठरू व या विभागात वाढ करू शकू. त्याचबरोबर ग्राहकांना बाजारपेठेतील सर्वोत्कृष्ट विक्री पश्चात सेवा देण्याबद्दल आम्हाला अभिमान आहे.’         

‘ग्राहकांना आरओ तंत्रज्ञानाचे लाभ आता पटू लागले आहेत आणि बाजारपेठेतील हा विभाग वेगाने वाढत आहे.  महाराष्ट्रातील ग्राहकांना वैविध्यपूर्ण उत्पादने देऊन सेवा देण्यास आम्ही उत्सुक आहोत,’ असेही कुळकर्णी म्हणाले.

भारतातील वॉटर प्युरिफिकेशन बाजारपेठ ही अंदाजे तीन हजार कोटी रूपयांची आहे व ती दोन अंकी वाढ नोंदवत आहे. १०० टक्के शुद्धता असा निकष तसेच काही पेटंट्स यामुळे व रिव्हर्स ऑस्मॉसिस (आरओ) क्षेत्रात एओ स्मिथ इंडिया ही वॉटर प्युरिफायर्स विभागातील देशातील आघाडीची खेळाडू बनली आहे.​
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link