Next
‘आयएसएचआरएई’ चॅप्टरचा पदग्रहण समारंभ
प्रेस रिलीज
Thursday, April 05 | 05:45 PM
15 0 0
Share this story

नंदकुमार मातोडेपुणे : इंडियन सोसायटी ऑफ हिटींग रेफ्रिजरेटींग एअरकंडिशनिंग इंजिनिअर्स (आय​​एसएचआरएई) पुणे चॅप्टरच्या नवीन संचालक मंडळाचा पदग्रहण समारंभ शुक्रवार सहा एप्रिल २०१८ रोजी हॉटेल रामी ग्रँड येथे सायंकाळी सहा वाजता होणार आहे. या पदग्रहण समारंभात २०१८-१९च्या नवीन मंडळाकडे कार्यभार सोपविला जाईल.

अनुश्री रिसवाडकर‘आयएसएचआरएई’चे माजी अध्यक्ष व किर्लोस्कर चिलर्सचे उपाध्यक्ष प्रशांत जोशी हे नवीन मंडळाला शपथ देतील. त्यामध्ये नवीन अध्यक्ष सुरज रानडे, सचिव अनुश्री रिसवाडकर, खजिनदार दीपक वाणी व इतरांचा समावेश आहे. २०१९-२०साठी नंदकुमार मातोडे यांची प्रेसिडेंट इलेक्ट म्हणून नियुक्ती झाली आहे.

सुरज रानडे‘या पदग्रहण समारंभानंतर ‘एनर्जी कॉन्झर्व्हेशन बिल्डिंग कोड’ या विषयावर आशु गुप्ता हे उर्जा कार्यक्षमता क्षेत्रातील तज्ञ सादरीकरण करतील. गेल्या वर्षी उत्कृष्ट कार्य करणार्‍या सदस्यांचा सत्कार केला जाईल. याच कार्यक्रमात ‘आयएसएचआरएई’च्या एसीआर ट्रेंडस आणि चिलर कॉनक्लेव्ह या राष्ट्रीय परिषदांच्या ब्रँडींगचे अनावरण केले जाईल,’ अशी माहिती मावळते अध्यक्ष केदार पत्की व सचिव नंदकुमार मातोडे यांनी दिली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link