Next
‘रक्तदानात पुणे देशात अव्वल’
खासदार वंदना चव्हाण यांचे गौरवोद्गार
BOI
Monday, August 26, 2019 | 03:39 PM
15 0 0
Share this article:

राम बांगड, राम बोरकर आणि स्वप्नील नाईक यांना खासदार अॅड. वंदना चव्हाण यांच्या हस्ते नागरी गौरव सन्मान प्रदान करण्यात आला. या वेळी अनंत घरत, किशोर रजपूत, ललित राठी आदी मान्यवर उपस्थित होते.

पुणे : ‘रक्तदानात महाराष्ट्र देशात अव्वल स्थानावर असून, महाराष्ट्रात पुणे प्रथम स्थानावर आहे. कार्यकर्ते आणि संस्थांचे मोठे जाळे पुण्यात आहे. पुण्याने अन्य वैशिष्ट्यांप्रमाणे हेही वैशिष्ट्य जपून ठेवावे,’ असे गौरवोद्गार खासदार वंदना चव्हाण यांनी काढले. शिवप्रजाराज्यम, ग्रीन रिव्हॉल्यूशन या संस्थांतर्फे राम बांगड, राम बोरकर आणि स्वप्नील नाईक यांना खासदार अॅड. वंदना चव्हाण यांच्या हस्ते नागरी गौरव सन्मान प्रदान करण्यात आला. त्या वेळी त्या बोलत होत्या. 

‘कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांचा सन्मान करण्याची ही प्रथा अनोखी असून, कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी समाजाने पुढे येऊन कायमस्वरूपी व्यवस्था उभारायला हवी,’ असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

‘महिला गृहउद्योग लिज्जत पापड’चे व्यवस्थापक सुरेश कोते आणि अॅड. प्रतापसिंह परदेशी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी ‘वनराई’चे मुकुंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे बबलू जाधव, व्यापारी महासंघाचे सचिन निवंगुणे, युवक क्रांती दल शहराध्यक्ष सचिन पांडुळे, अप्पा अनारसे आदी मान्यवर उपस्थित होते.

सुरेश कोते म्हणाले, ‘रक्तदान करणे ही खरी मानवसेवा असून, निरपेक्ष वृत्तीने समाजसेवा करण्याची वृत्ती वाढली पाहिजे.’

या वेळी पुरस्कारार्थी ‘रक्ताचे नाते’ संस्थेचे राम बांगड, मनसे उपाध्यक्ष राम बोरकर आणि स्वप्नील नाईक यांनी समाजकार्यातील आपले अनुभव सांगितले.

शिवप्रजाराज्यम संस्थेचे अध्यक्ष अनंत घरत, ‘ग्रीन रिव्हॉल्यूशन’चे अध्यक्ष किशोर रजपूत यांनी स्वागत केले. निमंत्रक ललित राठी यांनी आभार मानले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search