Next
रा. श्री. जोग पुरस्कार डॉ. मुलाटे यांच्या ग्रंथाला
प्रेस रिलीज
Thursday, April 05 | 04:10 PM
15 0 0
Share this story

पुणे : प्रख्यात समीक्षक कै. रा. श्री. जोग यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने दर वर्षी एका समीक्षा ग्रंथाला विशेष मानाचा पुरस्कार दिला जातो. या वर्षी या पुरस्कारासाठी ज्येष्ठ समीक्षक डॉ. वासुदेव मुलाटे यांच्या ‘बिंब प्रतिबिंब’ या समीक्षा ग्रंथाची निवड करण्यात आली आहे. ग्रंथाचे प्रकाशक म्हणून पुण्यातील स्वरूप प्रकाशनाच्या राजश्री पांगारकर यांनाही हा पुरस्कार दिला जाणार आहे. रोख रक्कम आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 

डॉ. वासुदेव मुलाटेडॉ. मनोहर जाधव, डॉ. तुकाराम रोंगटे आणि डॉ. वैजयंती चिपळूणकर यांच्या निवड समितीने या ग्रंथाची पुरस्कारासाठी निवड केली आहे. ज्येष्ठ समीक्षक डॉ. निशिकांत मिरजकर यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे आणि कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार यांचीही उपस्थिती असणार आहे. हा समारंभ, शुक्रवारी, सहा एप्रिल २०१८ रोजी, सायंकाळी साडेसहा वाजता, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे. कार्यवाह बंडा जोशी यांनी ही माहिती दिली. 

(बिंब प्रतिबिंब हा डॉ. वासुदेव मुलाटे यांचा ग्रंथ ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी http://www.bookganga.com/R/7ND7G येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link