Next
तीन, चार ऑगस्टला मंगळवेढ्यात राज्यस्तरीय साहित्य, संगीत संमेलन
आयोजन करणारी ‘मसाप’ची दामाजीनगर शाखा आदर्श घेण्यासारखी : डॉ. द. ता. भोसले
BOI
Tuesday, July 09, 2019 | 03:36 PM
15 0 0
Share this article:सोलापूर :
‘महाराष्ट्र साहित्य परिषदेची दामाजीनगर येथील शाखा महाराष्ट्रातील अग्रगण्य, आदर्श शाखा आहे. येथील अनेकविध उपक्रम व त्यांचे नियोजन या गोष्टींवरून याची कल्पना येते. या शाखेतील सातत्याने लेखन करणाऱ्यांची, विशेषतः महिलांची लक्षणीय संख्या पाहता या शाखेच्या नेतृत्वाने राबविलेल्या कल्पक उपक्रमांचे विशेष अभिनंदन करावे लागेल,’ असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. द. ता. भोसले यांनी काढले. ‘मसाप’ची दामाजीनगर शाखा, अखिल भारतीय नाट्य परिषदेची मंगळवेढा शाखा आणि सूरसंगम ग्रुपने तीन आणि चार ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय साहित्य व संगीत संमेलन आयोजित केले आहे. त्याच्या पूर्वतयारीच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीच्या प्रारंभी ‘मसाप’च्या दामाजीनगर शाखेचे अध्यक्ष प्रकाश जडे यांनी दोन दिवसांच्या साहित्य संमेलनाची संकल्पना आपल्या प्रास्ताविकात स्पष्ट केली. 

या वेळी अॅड. नंदकुमार पवार यांनी मंगळवेढ्याची संपन्न साहित्य परंपरा सांगून हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सर्वांनी मिळून यशस्वी करून दाखवू, असा विश्वास व्यक्त केला. तीन ऑगस्टला निमंत्रित महिलांचे साहित्य संमेलन होणार असून, चार ऑगस्टला महिला व पुरुषांचे संगीत संमेलन होणार आहे. 

माजी पालकमंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी राज्यस्तरीय संमेलनाचे नियोजन कसे करावे याचे तपशीलवार मार्गदर्शन करून साहित्य व नाट्य क्षेत्रातील नामांकित मंडळी या उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. डॉ. शरद शिर्के यांनी कार्यक्रमातील वेळेचे व्यवस्थापन महत्त्वाचे असल्याचे सांगून कार्यक्रमाच्या काटेकोर नियोजनासंदर्भात मार्गदर्शन केले. 

नगराध्यक्षा अरुणा माळी यांनी आपण मसाप शाखेच्या सक्रिय सभासद असल्याचे अभिमानाने नमूद करून संमेलनास सर्वतोपरी सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली. 

या नियोजन बैठकीला ‘मसाप पुणे’चे खास प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेले कल्याण शिंदे यांनी दामाजीनगर शाखेने अल्पावधीत राज्यस्तरीय संमेलनापर्यंत घेतलेली झेप वाखाणण्याजोगी असून स्थानिक शाखेने महिलांचे असे संमेलन भरविण्याचा हा बहुधा पहिलाच प्रयत्न असल्याचे सांगितले. ‘मसाप पुणे’च्या वतीने सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. 

दोन दिवसांच्या साहित्य संगीत संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण नगराध्यक्षा अरुणा माळी, डॉ. द. ता. भोसले व प्रा. लक्ष्मणराव ढोबळे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. हे आकर्षक बोधचिन्ह बनविणारे ‘ढगे डिजिटल’चे लहू ढगे व अखिल काझी यांचा विशेष गौरव करण्यात आला. 

या वेळी झालेल्या चर्चेत ‘सूरसंगम’चे दिगंबर भगरे, प्रा. कल्पेश कांबळे, लहू ढगे, अजय देशपांडे, राजेंद्र घाडगे आदींनी संगीत संमेलनाबाबत मार्गदर्शन केले. 

सूत्रसंचालन बालाजी शिंदे यांनी केले, तर अश्फाक काझी यांनी आभार मानले. या वेळी नाट्य परिषद राज्य नियामक मंडळाचे सदस्य यतिराज वाकळे, माजी उपनगराध्यक्ष चंद्रशेखर कोंडुभैरी, माजी नगरसेवक महादेव जिरगे, ज्ञानदीप संस्कार भारतीचे अध्यक्ष संभाजी सलगर, प्रायमाचे प्राचार्य नीलकंठ कुंभार, स्व. संजय सविता वाचनालयाचे अध्यक्ष राकेश गायकवाड, माजी मुख्याध्यापिका निर्मला पट्टणशेट्टी, मंगळवेढा तालुका माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे माजी व्हाइस चेअरमन नवनाथ सावळे, दामाजीनगर ग्रामपंचायत सदस्या वंदना तोडकरी, कृषिमित्र अजय अदाटे यांच्यासह जनार्दन नेने, चंद्रकांत पाटील, विठ्ठल मासाळ, संजय माने, रवींद्र लोकरे, अनिल गायकवाड, सुरेश माळी, संतोष गणगले, विनोद शिंदे, रेखा जडे, संगीता मासाळ, सुरेखा नाडगौडा, डॉ. राजेश्वरी महिमकर, प्रा. सुधा मांडवे, प्रा. लता माळी, सुषमा सुतार, दया वाकडे, रेश्मा गुंगे, विद्या माने, भारती नागणे, सुनीता गणगले, कल्याणी कोळी आदी उपस्थित होते. 

‘जिंदगी चहा’चे संचालक अजय अधाटे यांनी रसिक व मान्यवरांना या कार्यक्रमात ‘जिंदगी चहा’चा आस्वाद देणार असल्याचे सांगितले.

 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
अजय About 70 Days ago
मंगळवेढा मध्ये प्रथमच चांगल्या पध्दतीने साहित्य-संगीत संमेलन होत आहे, खूप अभिमानाची गोष्ट आहे
0
0

Select Language
Share Link
 
Search