Next
‘एसकेएफ’तर्फे क्रीडा शिक्षण कार्यक्रम जाहीर
प्रेस रिलीज
Friday, July 13, 2018 | 04:26 PM
15 0 0
Share this storyपुणे : गोथिया कपमधील सहभागाचा १०वा वर्धापनदिन साजरा करण्याच्या निमित्ताने एसकेएफ इंडियातर्फे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) विभागातील शाळांसाठी एसकेएफ क्रीडा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. एसकेएफ स्पोर्ट्स एज्युकेशन प्रोग्राम फॉर स्कूल्स (एसकेएफ शालेय क्रीडा शिक्षण कार्यक्रम) असे नाव असलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन एसकेएफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक कार्ल ऑर्सटाडीयस, ‘पीसीएमसी’चे महापौर नितीन काळजे आणि पीसीएमसी आयुक्त श्रावण हर्डीकर (आयएएस) यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

क्रीडा क्षेत्राच्या माध्यमाद्वारे मुलांमध्ये शारीरिक आणि मानसिक विकास घडवून आणणे हे ‘एसकेएफ’च्या सामाजिक बांधिलकी उपक्रमांच्या प्रणेत्या एसकेएफ कम्युनिटी अंब्रेलाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या या एसकेएफ शालेय क्रीडा शिक्षण कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. शालेय विद्यार्थ्यांचा जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू म्हणून विकास घडवून आणण्यासाठी हा कार्यक्रम सहाय्यभूत ठरणार आहे. मुलांना एरवी नसतील अशा प्रकारच्या मुबलक क्रीडा संधी उपलब्ध करून देणे, त्यांच्यातील निरामय प्रगतीला चालना देणे आणि समन्वित शिक्षण पुरविणे हे या कार्यक्रमाचे ध्येयधोरण आहे.

शालेय क्रीडा शिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना एसकेएफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक कार्ल ऑर्सटाडीयस.चिंचवड येथील एसकेएफ प्रकल्पाच्या परिसरातील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमधील ८० गुणवान मुले आणि मुलींची निवड केली जाणार असून, या विद्यार्थ्यांना ते शिकत असलेल्या शाळेत व्यावसायिक प्रशिक्षकांद्वारे आठवड्यातून दोन वेळा फुटबॉल खेळाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. जुलै २०१८च्या शैक्षणिक वर्षात सुरू झालेला हा कार्यक्रम मे २०२३पर्यंत चालणार आहे. या दरम्यान दुसरीपासून मुलांना शिकवण्यास सुरुवात केली जाणार असून ते दहावीमध्ये जाईपर्यंत त्यांना प्रशिक्षण दिले जात राहणार आहे.

या कार्यक्रमासाठीचे आमचे अंमलबजावणी भागीदार जस्ट फॉर किक्स (जेएफके) असून, निवड झालेल्या शाळांमध्ये जेएफकेतर्फे नियमित प्रशिक्षण वर्ग घेतले जातील. त्यांचे प्रशिक्षक अतिशय व्यावसायिक पद्धतीने हे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाईल. प्रत्येक शाळेत निवडक विद्यार्थ्यांसाठी एकूण ४८ प्रशिक्षण सत्रे घेतली जाणार आहेत. या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, नियमित गुणवत्ता पडताळणी व्हावी आणि एसकेएफ इंडियाच्या सीएसआर टीमला या सगळ्याचा तपशीलवार अहवाल मिळत राहावा यासाठी जेएफकेतर्फे एका खास कार्यक्रम व्यवस्थापकाची नेमणूक केली जाणार आहे. ‘जस्ट फॉर किक्स’द्वारा आयोजित इतर लीगमध्ये सहभागी होण्याची संधी मिळवून देण्यासाठी देखील अंमलबजावणी भागीदार प्रयत्नशील राहणार आहेत.

आपल्या कम्युनिटी केअर उपक्रमांतर्गत एसकेएफ इंडिया शाळांमध्ये उपक्रम राबविण्यासाठी जस्ट फॉर किक्सला आर्थिक सहाय्य करणार आहेत. एवढेच नव्हे, तर जसजशी वर्षे पुढे जातील, ८० जणांच्या प्रत्येक गटातील पाच गुणवान पात्र विद्यार्थ्यांची त्यांच्या गुणवत्ता आणि कामगिरीनुसार निवड केली जाईल आणि चिंचवड, पुणे येथील एसकेएफ क्रीडा अकादमीमध्ये खास प्रशिक्षण दिले जाईल; तसेच या निवडक पाच विद्यार्थ्यांना शालेय स्तरावरील सामन्यांत आपल्या शाळेचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळेल आणि कदाचित गोथिया कप सामन्यांत आपल्या संघाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी देखील मिळू शकेल.

दिलीप गावडेएसकेएफ शालेय क्रीडा शिक्षण कार्यक्रमादरम्यान यंदाच्या गोथिया कप स्पर्धेसाठीचा संघ देखील घोषित करण्यात आला. १७ मुले आणि १२ मुली असे दोन संघ यंदा गोथिया कप स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. पुणे आणि अहमदाबाद अशा दोन ठिकाणच्या मुला-मुलींचा या संघात समावेश असून, त्यांना वर्षभर अतिशय कठोर प्रशिक्षण देऊन तयार करण्यात आलेले आहे. आपल्या कम्युनिटी केअर उपक्रमांतर्गत गोथिया कप स्पर्धेत सहभागी होण्याचे एसकेएफचे यंदा दहावे वर्ष आहे.

एसकेएफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक कार्ल ऑर्सटाडीयस म्हणाले, ‘एसकेएफ क्रीडा कार्यक्रम हा क्रीडा क्षेत्रातील वैयक्तिक क्षमताबांधणी करणे आणि औपचारिक प्रशिक्षण व सामाजिक कौशल्य वृद्धीद्वारे त्यांचा क्षमताविस्तार करणे या दृष्टीने आखण्यात आलेला आहे. समाजाचे देणे त्यांना पुन्हा चुकते करण्यासाठी समाजासाठी सक्षम कार्यक्रम तयार करण्यावर आमचा गाढ विश्वास आहे.’

‘क्रीडा प्रकारच्या रूपाने आम्ही मुलांना एकत्र काम करणे, संघटीत होऊन काम करणे आणि संघाच्या कामगिरीमध्ये असलेले प्रत्येकाचे वैयक्तिक महत्त्व ठसवणे असे जीवनातील अत्यंत मौल्यवान धडे देत आहोत. मुलांमध्ये एक धडाडी रुजवणे आणि त्यांना संकटाचा मुकाबला करून त्यातून बाहेर येण्यासाठी प्रेरित करणे ही कामे देखील या कार्यक्रमाच्या माध्यमातून होणार आहेत. आमच्या सहभागाच्या दहाव्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने मी सर्व संघांना त्यांच्या कामगिरीसाठी शुभेच्छा देतो,’ असे ऑर्सटाडीयस यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link