Next
‘कामगारांची सुरक्षितता महत्त्वाची’
प्रेस रिलीज
Friday, March 16, 2018 | 04:49 PM
15 0 0
Share this storyपुणे :
‘कामगार हा कुठल्याही बांधकाम प्रकल्पाचा आधारस्तंभ असतो. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्य प्राधान्य दिले पाहिजे,’ असे मत गोयल गंगा डेव्हलपर्सचे संचालक अमित गोयल यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह चार ते १० मार्च या दरम्यान साजरा केला जातो. गोयल गंगा फाउंडेशनकडून बावधन येथील गंगालेजंड येथे कामगारांसाठी सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.

‘कामगारांमुळेच बांधकाम व्यवसाय यशस्वी होऊ शकतो. अनेक वेळेला त्याला उंचावर काम करावे लागते. पुरेशी काळजी न घेतल्याने काही वेळेला अपघात होतात, प्रसंगी यामुळे कामगारांना जीव ही गमवावा लागतो. हे व्यावसायिकांना निश्चितच भूषणावह नाही. यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी कामगारांची सुरक्षितता जपणे आवश्यक आहे,’ असे गोयल म्हणाले.

‘कामगारांनी ही काळजी घेऊन काम केले पाहिजे. यासाठी अनेक सुरक्षा उपकरणे उपलब्ध आहेत. याचा वापर केला पाहिजे; तसेच ही उपकरणे वापरण्यासंदर्भात कामगारांना प्रशिक्षित करणे गरजेचे आहे. ‘गोयल गंगा’ने ही नेहमी कामगारांच्या सुरक्षिततेला नेहमी प्राधान्य दिल आहे. कामगारांच्या सुरक्षिततेबद्दल ‘गोयल गंगा’ नेहमी सजग असते,’ असे त्यांनी नमूद केले.

कामगारांनी काम करताना कशाप्रकारे काळजी घेतली पाहिजे, याबद्दल सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने गंगालेजंड येथे माहिती देण्यात आली. या वेळी मजुरांना या सुरक्षेसंदर्भातील बारकावेही सांगतानाच उंचावर काम करताना हेल्मेट व सेफ्टी बेल्टच्या वापराचे महत्त्वही पटवून देण्यात आले.

‘स्वत: सुरक्षा उपकरणांचा वापर करावा, तसेच इतरांनाही अशा सुरक्षा उपायांचा वापर करण्यास प्रेरित करावे,’ असे या वेळी कामगारांना सांगण्यात आले. कामगारांनी सर्व सुरक्षा उपाययोजनांचे पालन करण्याची शपथ या वेळी घेतली. कंत्राटदार, सुपरवायझर आणि मजूर या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

या वेळी मुख्य अभियंता कुमार बर्डे व प्रोजेक्ट मॅनेजर वीरेन कुसुरकर उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link