Next
वाय. एच. मालेगम यांना ‘स्कॉलर ऑफ द इयर’ पुरस्कार जाहीर
नेस वाडिया वाणिज्य महाविद्यालयातर्फे १६ जुलैला करणार प्रदान
प्रेस रिलीज
Monday, July 15, 2019 | 05:35 PM
15 0 0
Share this article:

वाय. एच. मालेगमपुणे : नेस वाडिया वाणिज्य महाविद्यालयातर्फे पद्मश्री पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट वाय. एच. मालेगम यांना या वर्षीचा ‘स्कॉलर ऑफ द इयर’ पुरस्कार जाहीर झाला आहे. या महाविद्यालयाच्या ५१व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने १६ जुलै २०१९ रोजी मालेगम यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. 

या पुरस्कार वितरण सोहळ्यापूर्वी दुपारी चार वाजता ‘बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या- पुढील प्रवास’ या विषयावर मालेगम यांचे नेस वाडिया वाणिज्य महाविद्यालयातील नेव्हिल वाडिया सभागृहात व्याख्यान होणार आहे. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता महाविद्यालय प्रांगणातील टाटा असेंब्ली सभागृहात पुरस्कार वितरण केले जाणार आहे. वाणिज्य, अर्थशास्त्र, वित्त, व्यवस्थापन व व्यावसायिक शिक्षण या क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या तज्ज्ञ व्यक्तीस दर वर्षी महाविद्यालयातर्फे ‘स्कॉलर ऑफ द इयर’ पुरस्कार प्रदान केला जातो.  

नेस वाडिया महाविद्यालयाची स्थापना १९६९ साली करण्यात आली असून, पुण्यातील वाणिज्य शाखेतील एक प्रतिथयश महाविद्यालय अशी ओळख संस्थेने प्राप्त केली आहे. वाणिज्य शाखेतील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम येथे शिकविले जातात. जवळपास पाच हजारहून अधिक विद्यार्थी असलेले हे महाविद्यालय आपला ५१वा वर्धापन दिवस १६ जुलैला साजरा करत आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search