Next
गृहरचना, इंटेरिअर डिझाइन्सच्या छायाचित्र प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद
BOI
Monday, January 21, 2019 | 05:28 PM
15 0 0
Share this storyपुणे :
छायाचित्रकार आनंद दिवाडकर यांनी काढलेल्या, आकर्षक वास्तुशैलीच्या गृहरचना आणि वैविध्यपूर्ण इंटेरिअर डिझाइन्सच्या छायाचित्रांचे पहिले प्रदर्शन पुण्यात १७ आणि १८ जानेवारी २०१९ रोजी आयोजित करण्यात आले होते. त्याला कलाप्रेमी नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवनामधील राजा रविवर्मा कलादालनात भरविलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन जागतिक कीर्तीचे वास्तुविशारद ख्रिस्तोफर बेनिंजर यांच्या हस्ते झाले. कलाप्रेमी नागरिकांसह अनेक नामवंत कलाकार, कला क्षेत्रातील ख्यातनाम व्यक्तींनी या प्रदर्शनाला भेट दिली. 

ख्रिस्तोफर बेनिंजर यांच्यासह आनंद दिवाडकर

आनंद दिवाडकर गेली दोन दशके डिझाइन फोटोग्राफी या क्षेत्रात कार्यरत आहेत. अनेक डिझायनर्ससाठी त्यांनी फोटोग्राफी केली असून, त्यांनी काढलेले फोटो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक नियतकालिकांमध्येही प्रसिद्ध झाले आहेत. ‘मी फोटोग्राफी केलेल्या हजारो साइट्समधून काहींची प्रदर्शनासाठी निवड करणे हे अवघड काम होते. तरीही माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासून ज्यांच्यासोबत मी काम केले किंवा ज्यांच्या सुरुवातीपासून मी त्यांच्यासाठी काम केले, अशा वेगवेगळ्या ३० डिझायनर्सच्या कामांची मी काढलेली छायाचित्रे या प्रदर्शनात मांडली होती. त्यात अनेक दिग्गज, तसेच नव्याने उदयाला येत असलेले आर्किटेक्ट्स आणि डिझायनर्सच्या कामाचा समावेश होता,’ अशी माहिती आनंद दिवाडकर यांनी दिली. ‘फॅमिली इंटेरिअर्स’ने आयोजित केलेले हे हे प्रदर्शन ‘श्री चामुंडा स्टोन्स’ यांनी प्रायोजित केले होते. 

अजित गाडगीळ यांनीही प्रदर्शनाला भेट दिली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Usha K Torgal About 26 Days ago
It was the first exhibition of interior photography I attended. It was not just photography, but exhibition of real passion and sincerity in work......it was a treat for the eyes. Wishing him more success
0
0
Shraddha Apte About 28 Days ago
It was a visual treat..A glimpse of architectural marvels best brought to the public through his photography..Huge applause for his first exhibition..
1
0

Select Language
Share Link