Next
गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ६९ टक्के मतदान
प्रेस रिलीज
Friday, April 12, 2019 | 12:31 PM
15 0 0
Share this article:

गडचिरोली : गडचिरोली-चिमूर (अ.ज) लोकसभा मतदारसंघातील मतदान पथकांकडून रात्री नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार सरासरी ६९ टक्के मतदान झाल्याची प्राथमिक माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेकडून देण्यात आली आहे.

१२ गडचिरोली-चिमूर (अ.ज) लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात म्हणजेच ११ एप्रिल २०१९ रोजी मतदान झाले. सकाळी सात वाजल्यापासून सर्वत्र शांततेत मतदानास सुरुवात झाली. सर्व मतदान केंद्रावर सुरुवातीला मॉकपोल घेण्यात आले. ९५ केंद्रावर वेबकास्टिंग करण्यात आले. एटापल्ली तालुक्यातील कसनसूरजवळील मौजा वागेझरीजवळ आईडी ब्लास्ट, गट्टा जांबीया गावाजवळ, तसेच पुरसलगोंदी गावावळ झालेल्या भुसुरुंगाच्या स्फोटात दोन जवान जखमी झाल्याची घटना घडली. या घटना वगळता जिल्ह्यात व मतदारसंघात शांततेत मतदान पार पडल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेमार्फत देण्यात आली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search