Next
चित्रपटातून उलगडणार भारतीय फुटबॉलचा सुवर्णकाळ
अभिनेता अजय देवगण असेल मुख्य भूमिकेत
BOI
Tuesday, March 05, 2019 | 05:59 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : ‘बधाई हो’ चित्रपटाचे दिग्दर्शक अमित शर्मा लवकरच एका नवीन चित्रपटाच्या तयारीला लागणार आहेत. हा एक खेळावरचा बायोपिक असेल, असे त्यांनी सांगितले आहे. अभिनेता अजय देवगणला घेऊन ते हा चित्रपट बनवणार असून येत्या मे-जूनच्या दरम्यान चित्रपटाचे चित्रिकरण सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 

‘फुटबॉल’ या खेळावर आधारित हा चित्रपट असणार आहे. १९५१ ते १९६२ हा काळ भारतीय फुटबॉलसाठीचा सूवर्णकाळ (गोल्डन पिरियड) समजला जातो. या काळातील भारतीय फुटबॉल असा विषय घेऊन हा चित्रपट बनवला जाणार आहे. या चित्रपटात फुटबॉलचा हा सुवर्णकाळ दाखवण्यात येणार आहे. अभिनेता अजय देवगण हा ‘सय्यद अब्दूल रहिम’ यांच्या भूमिकेत दिसणार आहे, जे या काळात भारतीय राष्ट्रीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक आणि व्यवस्थापक होते. 

‘माझा येणारा चित्रपट हा फुटबॉल या खेळावर आधारित असलेला चित्रपट असून ती एक पिरियड फिल्म असेल. येत्या दोन-तीन महिन्यांच्या काळात म्हणजेच साधारण मे-जून दरम्यान आम्ही चित्रिकरणाला सुरुवात करणार आहोत. मला वाटते असे चित्रपट घेऊन येण्यासाठी ही योग्य वेळ आहे. आजकाल प्रेक्षकांचा टिपिकल लव्ह स्टोरीजपेक्षा अशाच चित्रपटांकडे ओढा आहे. त्यामुळे हा चित्रपट शक्य तेवढ्या लवकर पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असेल’, अशी माहिती शर्मा यांनी दिली.   

अर्जून कपूर आणि सोनाक्षी सिन्हा यांचा ‘तेवर’ हा अमित शर्मा यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट होता. हा चित्रपट प्रेक्षकांच्या फारसा पसंतीस उतरला नाही, परंतु त्यानंतर आलेला ‘बधाई हो’ मात्र यशस्वी ठरला. चित्रपटाच्या दिग्दर्शनाबाबत शर्मा यांना विचारले असता, ते म्हणाले, ‘चित्रपट बनवणे ही गोष्ट कोणीही कोणालाही शिकवू शकत नाही. ती अंगीभूत असावी लागते. सुरुवातीपासूनच ती तुमच्यात असावी लागते. तुमच्यातलेच यासाठी लागणारे काही गुण आणि पोटॅन्शिअल वापरून तुम्हाला ती गोष्ट साध्य करावी लागते.’ 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search