Next
अर्विंग वॉलेस
BOI
Monday, March 19, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this story

आपल्या ३३ कादंबऱ्यांचा १२ कोटींवर खप, ३१हून अधिक भाषांमध्ये भाषांतरं आणि ६० कोटींवर चाहते लाभलेल्या अर्विंग वॉलेसचा १९ मार्च हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्याचा अल्प परिचय....
..............
१९ मार्च १९१६ रोजी इलिनॉयमध्ये जन्मलेला अर्विंग वॉलेस हा गेल्या शतकाच्या उत्तरार्धातला संशोधनपूर्वक कादंबऱ्या लिहिणारा एक तुफान यशस्वी कादंबरीकार. त्याच्या बहुतेक सर्वच कादंबऱ्या कायमच बेस्टसेलर ठरल्या होत्या. त्याने किशोर वयातच मासिकांतून कथा लिहायला सुरुवात केली होती.
 
पुढे त्याने हॉलीवूडमध्ये मोर्चा वळवला आणि तो पटकथाकार बनला. पण तिथे मन न रमल्याने तो कादंबरी लेखनाकडे वळला आणि द चॅपमन रिपोर्ट या तुफानी खपाच्या कादंबरीनंतर त्याने पूर्णवेळ कादंबरी-लेखनाकडे लक्ष केंद्रित केलं आणि जवळपास ३३ कादंबऱ्या लिहिल्या ज्यांची ३१हून अधिक भाषांमध्ये भाषांतरं झाली.

एका धूर्त प्लॅननुसार रशियाची केजीबी ही संघटना अमेरिकेच्या अध्यक्ष्यांच्या पत्नीचं अपहरण करून तिच्या जागी तिच्यासारख्याच दिसणाऱ्या आपल्या एका गुप्तहेर स्त्रीला थेट व्हाईट हाउसमध्ये पाठवून देतात आणि पुढे काय विलक्षण घटना घडतात ते सांगणारी त्याची ‘द सेकंड लेडी’ ही कादंबरी विशेष गाजली. त्यावर शरारा नावाचा हिंदी सिनेमाही आला होता. 

पांढरपेशी आणि उच्चभ्रू मनोवृत्ती, त्यांच्या धारदार भावना, प्रेम, प्रणय, गूढ रहस्य, स्वैराचार असे विषय त्याच्या कादंबऱ्यांतून डोकावत असत. त्याच्या कादंबऱ्यांचा खप १२ कोटींहून अधिक होता. त्याच्या लिखाणात जादू होती आणि त्याच्या लेखनाचं व्यसन जडलेले त्याचे ६० कोटी चाहते होते.  

दी चॅपमन रिपोर्ट, दी प्राइझ, दी थ्री सायरेन्स, दी मॅन, दी प्लॉट, दी सेव्हन मिनिट्स, दी निम्फो अँड अदर मॅनीअॅक्स, दी वर्ड, दी फॅन क्लब, दी पिजन प्रोजेक्ट, दी सेकंड लेडी, दी ऑलमाइटी, दी मिरॅकल, दी सेवन्थ सिक्रेट, दी सेलेस्टिअल बेड, दी गेस्ट ऑफ ऑनर – अशी त्याची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

२९ जून १९९० रोजी त्याचा लॉस एंजलीसमध्ये मृत्यू झाला.    

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link