Next
डॉ. पराग संचेती यांना ‘डॉक्टर्स ऑफ लॉज’ सन्मान
युनिव्हर्सिटी ऑफ डंडी स्कॉटलंडकडून मानद डॉक्टरेट
BOI
Saturday, June 29, 2019 | 02:01 PM
15 0 0
Share this article:


पुणे : संचेती इन्स्टिट्यूट ऑफ ऑर्थोपेडिक अँड रिहॅबिलिटेशनचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. पराग संचेती यांना युनिव्हर्सिटी ऑफ डंडी स्कॉटलंडकडून ‘डॉक्टर्स ऑफ लॉज’ या मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले आहे. हा सन्मान मिळवणारे डॉ. संचेती हे पहिले भारतीय आहेत.

या निमित्ताने त्यांचा समावेश सन्मानप्राप्त एलिट वर्गात झाला आहे. त्यांनी आरोग्य क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल आणि समाजातल्या तळागाळातल्या घटकांपर्यंत आरोग्यसेवा माफक दरात पोहोचवल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. 

१९६७ मध्ये राणी एलिझाबेथ यांना हा सन्मान मिळाला होता. हा पदवीदान सोहळा युनिव्हर्सिटी ऑफ डंडीमधील स्कूल ऑफ मेडिसिनच्या समर ग्रॅज्युएशन  या कार्यक्रमांतर्गत स्कॉटलंड येथे झाला. कुलपती प्रा. जोसलीन बेल बरनेल यांच्या हस्ते ही पदवी डॉ. संचेतींना प्रदान करण्यात आली. डॉ. पराग संचेती यांनी ४०० विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ही पदवी स्वीकारताना, वैद्यकीय क्षेत्रातील आपला अनुभव सांगितला. ‘या क्षेत्रात काम करणे एक मोठे काम असून, रुग्णांकडून मिळालेले आशीर्वाद हे अविस्मरणीय असतात,’ असे ते म्हणाले.

संचेती हॉस्पिटलचे संस्थापक डॉ. के. एच. संचेती यांचा वारसा यशस्वीरीत्या पुढे नेताना डॉ. पराग संचेती यांना मिळालेला हा सन्मान म्हणजे आणखी एक मानाचा तुरा आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search