Next
शेती-प्रगती कृषिभूषण पुरस्कार जाहीर
फराटे, लटपटे, सकाप्पा, लकेसर, खाडे, सुरेखा पाटील यांचा राजू शेट्टींच्या हस्ते गौरव होणार
BOI
Wednesday, January 16, 2019 | 11:18 AM
15 0 0
Share this storyकोल्हापूर :
शेती-प्रगती मासिकाचा चौदावा वर्धापनदिन समारंभ २३ जानेवारी २०१९ रोजी कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन येथे खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत होणार आहे. शेतकरी संघटनेतील जुने कार्यकर्ते आणि मौजे डिग्रज येथील प्रयोगशील शेतकरी जयपालण्णा फराटे, सावळवाडीचे प्रशांत लटपटे, दानोळीचे चवगोंडा अण्णा सकाप्पा, दुधारीचे अमोल लकेसर, करमाळा तालुक्यातील जेऊर येथील बळीराम जाधव, मिरज तालुक्यातील बेडग येथील शंकर धोंडिबा खाडे यांच्यासह दहा जणांना शेती-प्रगती कृषिभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आणि सोनहिरा साखर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी मारुती आनंदा जाधव यांना कृषी विस्तार कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 

राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे चेअरमन पी. आर. पाटील समारंभाच्या अध्यक्षस्थानी असतील. ‘गोकुळ’चे माजी चेअरमन अरुण नरके, ‘आरसीएफ’चे कार्यपालक संचालक एन. एच. कुरणे व जनरल मॅनेजर सुहास शेलार, आनंद कोठाडिया आणि कोल्हापूर विभागीय कृषी सहसंचालक दशरथ तांबाळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. शेती-प्रगती मासिकाचे संपादक रावसाहेब पुजारी यांनी कोल्हापुरात पत्रकारांना ही माहिती दिली. 

याच समारंभात तेजस पब्लिकेशनच्या चार पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. हिरव्या बोटांचे किमयागार (डॉ. व्ही. एन. शिंदे, कोल्हापूर), जी. एम. पिकांची दुनिया (डॉ. वसंतराव जुगळे, सांगली), शेतकरी स्वातंत्र्याची रणनीती (सुधाकर जाधव, पांढरकवडा-यवतमाळ) आणि कायापालट क्षारपीडित जमिनींचा (रावसाहेब पुजारी, कोल्हापूर) या चार पुस्तकांचा त्यात समावेश आहे. ‘महिलांचा शेतीतील सहभाग’ या विषयावर शेती-प्रगती मासिकाने प्रसिद्ध केलेल्या वर्धापनदिन विशेषांकाचेही या वेळी प्रकाशन होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन पुजारी यांनी केले. 

पुरस्कारविजेत्यांबद्दल अधिक माहिती

- जयपालण्णा फराटे, मौजे डिग्रज, ता. मिरज, जि. सांगली (शेतकरी संघटन, ऊस, हळदीचे विविध प्रयोग, क्षारपड जमीन विकासात काम), 
- प्रशांत लटपटे, सावळवाडी, ता. मिरज, जि. सांगली (एकरी १४० टन ऊस उत्पादन)
- चवगोंडा अण्णा सकाप्पा, दानोळी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर (सेंद्रिय पद्धतीने एकरी ९७ टन ऊस उत्पादन)
- शंकर धोंडिबा खाडे, बेडग, ता. मिरज, जि. सांगली (सेवानिवृत्तीनंतर आदर्श गोठा व्यवस्थापन)
- अमोल लकेसर, दुधारी, ता. पलूस, जि. सांगली (खोडवा उसाचे एकरी ११९ टन उत्पादन)
- बळीराम जाधव, जेऊर, ता. करमाळा, जि. सोलापूर (केळी, सीताफळांचे कमी खर्चात विक्रमी उत्पादन) 
- संजय शिवाप्पा माळी, जांभळी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर (ऊस रोपवाटिका व्यवसायात पायाभूत काम)
- सतीश जयपाल चौगुले, मु. पो. भिलवडी, ता. पलूस, जि. सांगली (ऊस, हळदीचे विक्रमी उत्पादन),
- बाळासाहेब सोळांकुरे-पाटील, हेळेवाडी, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर (सेंद्रिय शेती, कृषी पर्यटनासाठी काम)
- सुरेखा अनिल पाटील, निमशिरगाव, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर (सलग ३५ वर्षे गवार उत्पादनात विक्रम)
- चंद्रकांत सूर्यवंशी, कृषी विकास अधिकारी, जि. प. कोल्हापूर (शासकीय कृषी योजना राबविण्यात अग्रेसर)
- मारुती आनंदा जाधव, ऊस विकास अधिकारी, सोनहिरा साखर कारखाना, वांगी, ता. पलूस, जि. सांगली (ऊस विकास योजनेमध्ये लक्षवेधी काम)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link