Next
‘सिंथॉल’ची नवी मेन्स ग्रुमिंग उत्पादने दाखल
प्रेस रिलीज
Thursday, September 20, 2018 | 11:27 AM
15 0 0
Share this article:

मुंबई : सिंथॉल या लोकप्रिय बँडने चेहरा, शरीर, केस व दाढी यांसाठी आठ नवे प्रकार दाखल करून मेल ग्रुमिंग बाजारपेठेत प्रवेश केल्याचे जाहीर केले आहे. सिंथॉलच्या मेल ग्रुमिंग उत्पादनांचे अनावरण गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडचे (जीसीपीएल) भारत व सार्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील कटारिया यांनी ग्रुमिंग शोमध्ये केले. यामध्ये एशियन गेम्समधील सुवर्णपदकविजेते अर्पिंदर सिंग व अभिनेता हर्षवर्धन कपूर हे शोस्टॉपर्स होते.

ही उत्पादने दाखल केल्याने पाच हजार ५०० कोटी रुपये उलाढाल असलेल्या मेल ग्रुमिंग मार्केटमध्ये परिपूर्ण ग्रुमिंग उत्पादने दाखल करणारा सिंथॉल हा पहिलावहिला ब्रँड ठरला आहे. सिंथॉल हा पुरुषांसाठीचा भारतातील एक वैशिष्ट्यपूर्ण ब्रँड आहे आणि पुरुषांच्या अपेक्षा जाणून घेत या ब्रँडने प्रगती साधली आहे. सिंथॉलची मेल ग्रुमिंग उत्पादने सर्वंकष असून, त्यामध्ये नाविन्यपूर्ण, विविध फायदे असणाऱ्या व अत्यंत उपयुक्त, प्रामुख्याने आधुनिक पुरुषांसाठी तयार केलेल्या उत्पादनांचा समावेश आहे.

सिंथॉलने सादर केलेल्या मेल ग्रुमिंग उत्पादनांमध्ये सिंथॉल शेव्ह + फेस वॉश आणि सिंथॉल आफ्टर शेव्ह + आफ्टर ट्रिम (फेस), सिंथॉल हेड टू टो वॉश (बॉडी), सिंथॉल हेअर क्रीम व सिंथॉल हेअर जेल (हेअर) व सिंथॉल बिअर्ड ऑइल, सिंथॉल बिअर्ड वॅक्स व सिंथॉल बिअर्ड + फेस वॉश (बिअर्ड) या आठ नव्या उत्पादनांचा समावेश आहे.

सिंथॉलने मेल ग्रुमिंग मार्केटमध्ये प्रवेश केल्याबद्दल, गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडचे (जीसीपीएल) भारत व सार्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील कटारिया म्हणाले, ‘भारतातील १८ ते २५ वर्षे वयोगटातील पुरुष महिलांपेक्षा अधिक पैसे ग्रुमिंग व पर्सनल केअर उत्पादनांवर खर्च करतात, असे पाहणीत आढळले आहे. त्यांना वेळ वाचवतील, असी सोपी व बहुपयोगी उत्पादने हवी असतात. सिंथॉल मेल ग्रुमिंग उत्पादने ही गरज पूर्ण करतात आणि ती पुरुष ग्राहकांचे जीवन अधिक सुंदर व ताजेतवाने करतील, असा विश्वास आहे.’

‘मी विशेषतः पहिल्यावहिल्या सिंथॉल शेव्ह + फेसवॉश व फेसवॉश, तसेच बिअर्ड + फेस वॉश, वॅक्स ऑइल, आफ्टर शेव्ह + आफ्टर ट्रिम यांचा समावेश असलेल्या आणि बहुपयोगी व वापरण्यास सोप्या असलेल्या संपूर्ण बिअर्ड उत्पादनांबद्दल याबद्दल अधिक उत्सुक आहे,’ असे कटारिया यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search