Next
यूएनसीटीएडीमध्ये इंडियामार्टद्वारे भारताचे प्रतिनिधित्व
प्रेस रिलीज
Thursday, April 26 | 04:21 PM
15 0 0
Share this story

मुंबई : भारतातील सर्वात मोठी ऑनलाइन बाजारपेठ ‘इंडियामार्ट’ने जिनेव्हा येथील संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यापार आणि विकास (यूएनसीटीएडी) ईकॉमर्स सप्ताहात भारताचे प्रतिनिधित्व करताना, भारतातील ई-कॉमर्स क्षेत्र आणि त्यांना मिळालेले यश याची मांडणी केली. इंडियामार्टचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. दिनेश अगरवाल आणि सह-संस्थापक आणि संचालक ब्रिजेश अग्रवाल यांनी विकासनशील जगातील एक यशस्वी डिजिटल अर्थव्यवस्था विकसित करण्यासाठी काय करावे आणि त्याचा कसा प्रभाव पडतो याविषयी चर्चा केली. जगभरातील तज्ज्ञ या वेळी उपस्थित होते.

या वेळी झालेल्या चर्चासत्रात जागतिक व्यापार संघटनेचे महाव्यवस्थापक रॉबेर्तो आझ्वेडो, यूएनसीटीएडीचे सेक्रेटरी जनरल डॉ. मुखिसा किट्यूयी यांनी विकसनशील आणि किमान विकसित देशांतील डिजिटल-प्रथम युगातील व्यवसाय कसे तग धरू शकतील आणि विकसित होतील याबद्दल तपशीलवार चर्चा केली. दिनेश आणि ब्रिजेश यांनी भारताच्या डिजिटल व्हिजनची मांडणी या वेळी केली.  भारतात घडणाऱ्या डिजिटल बदलांच्या माध्यमातून प्रेरणा घेऊन इतर विकसनशील देश कशाप्रकारे प्रगती करू शकतील, यावर आपले मत व्यक्त केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link