पुणे : ‘सरहद’तर्फे दुसरी कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन २४ जून २०१८ ला कारगिल येथे आयोजित करण्यात आली आहे. रनबडी, सेवक आणि स्वानंद अॅडव्हेंचर यांच्या सहकार्याने या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे आयोजन केले आहे, अशी माहिती संयोजक संजीव शहा यांनी दिली.
कारगिलमध्ये पर्यटन आणि क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी सरहद संस्थेतर्फे १६ जुलै २०१७ ला पहिल्या कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे आयोजन केले होते. यात राज वडगामा, पहिले ब्लड रनर मेजर डी. पी. सिंग, ले. कर्नल सुदर्शन, संजय चिकारा यांसारख्या नामवंत धावपटूंसह विविध देशातील अनेक धावपटू सहभागी झाल्याने पहिल्याच वर्षी मोठा प्रतिसाद मिळाला. या मॅरेथॉनमध्ये एक हजार ५०० हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते.
‘पहिल्या स्पर्धेच्या उदंड प्रतिसादानंतर २०१८मध्ये पुन्हा ही स्पर्धा तीन, पाच, १०, २१ २४ व ६० किमी अल्ट्रा मॅरेथॉन व १२० किमी टायगर हील चॅलेंग या प्रकारांमध्ये कारगिलमध्ये होणार आहे. या स्पर्धेतही उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे,’ असे आवाहन शहा यांनी केले आहे.
संपर्क :वेबसाइट : www.kargilmarathon.comमोबाइल : ९८२२० ३८२८२