Next
महत्त्व ‘इन्कम’चे...
BOI
Sunday, December 03 | 03:45 PM
15 0 0
Share this story

शेअर बाजारात गुंतवणूक सुरू करतानाची तत्त्वे सांगणाऱ्या SMILE या शब्दाचे स्पष्टीकरण आपण पाहत आहोत. त्यातील ‘एस’ म्हणजे ‘सेफ्टी’ आणि ‘एम’ म्हणजे मार्केटॅबिलिटी हे आपण पाहिले. त्यातील ‘आय’ म्हणजे ‘इन्कम.’ त्याबद्दल आज पाहू या... ‘समृद्धीची वाट’ या सदरात...
.....

गुंतवणुकीसाठी विचार करीत असलेल्या SMILE या शब्दातील महत्त्वाचे असलेले तिसरे अक्षर म्हणजे I होय. ‘I’ म्हणजे इन्कम. जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत खर्च करण्यासाठी प्रत्येकाला ‘इन्कम’ची गरज असते. नोकरी किंवा व्यवसाय करून पैसे मिळवायला लागल्यापासून निवृत्तीनंतरही माणसाला सतत काही तरी उत्पन्नाची जरुरी असते. मिळालेल्या उत्पन्नातून आपण काही भाग बचत म्हणून बाजूला ठेवतो. भविष्यकाळासाठी करावयाची बचत म्हणजे आजच्या उपभोगावर सोडलेले पाणी असते. राहण्यासाठी एक घर घेतल्यानंतर दुसरे घर घेण्यासाठी काही उत्पन्न वापरले, तर त्यावर भाडेस्वरूपात उत्पन्न मिळू शकते; पण हे उत्पन्न आवक रकमेपेक्षा जास्त असू शकत नाही. सोने, चांदी, दागिने यात बचत केली, तर त्यावर उत्पन्न मिळत नाही. बँका व कंपन्यांमध्ये मुदतठेवी ठेवल्या, तर त्यावर व्याजाचे उत्पन्न मिळते; पण हल्ली हे मिळणारे व्याज तुटपुंजे असते.

याउलट शेअर्समध्ये किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली, तर त्यावर कंपनीकडून दर वर्षाला लाभांश मिळू शकतो. हल्ली कित्येक कंपन्या अंतरिम लाभांशही देतात. कंपनीच्या शेअर्सच्या भावाच्या तुलनेत मिळणाऱ्या लाभांशाच्या परताव्याची टक्केवारी कमी असते; पण ते एक खात्रीचे, चांगले उत्पन्न असते.लाभांशाचे हे उत्पन्न करमुक्त असते. शेअर्स किंवा म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीतून मिळणारे दुसरे उत्पन्न म्हणजे भाव वाढल्यानंतर शेअर्स विकले की होणारा भांडवली नफा. खरेदी केल्यापासून बारा महिन्यांच्या आत शेअर्सची विक्री केली, तर होणारा नफा करपात्र असतो. सध्या अशा अल्पमुदतीच्या भांडवली नफ्यावरील कर १५ टक्के आहे. खरेदी केल्यापासून एक वर्षानंतर विक्री केली, तर होणाऱ्या भांडवली नफ्यावर कर द्यावा लागत नाही. योग्य वेळी योग्य किमतीला खरेदी केली, तर कित्येकदा हे उत्पन्न प्रचंड मोठे असू शकते. म्हणूनच SMILEमधील ‘I’चे महत्त्व अनन्यसाधारण असेल.

- डॉ. वसंत पटवर्धन

(लेखक ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे माजी अध्यक्ष आहेत.)

(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर शनिवारी आणि रविवारी प्रसिद्ध होईल. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध असतील.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link