Next
‘हॅपिनेस्ट’ गृह प्रकल्पात झपाट्याने विक्री
प्रेस रिलीज
Tuesday, April 10, 2018 | 02:52 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘हॅपिनेस्ट पालघर’ या महिंद्रा लाइफस्पेसेसच्या तिसऱ्या परवडणाऱ्या गृह प्रकल्पाने केवळ ४५ दिवसांमध्ये ४०० युनिटची विक्री कली आहे. हा प्रकल्प महिंद्रा हॅपिनेस्ट डेव्हलपर्स लि. (एमएचडीएल) या महिंद्रा लाइफस्पेसेस डेव्हलपर्स लि. (एमएलडीएल) व एचडीएफसी कॅपिटल अफोर्डेबल रिअल इस्टेट फंड-१ (एचडीएफसी कॅपिटल) यांच्यातील संयुक्त प्रकल्प आहे. हा प्रकल्प दाखल करताना, फेब्रुवारी २०१८मध्ये पहिला टप्पा जाहीर झाला व त्यास भरभरून प्रतिसाद मिळाल्याने त्यानंतर लगेचच मार्च २०१८मध्ये दुसरा टप्पा जाहीर करण्यात आला.

‘एमएलडीएल’च्या व्यवस्थापकीय संचालक अनिता अर्जुनदास म्हणाल्या, ‘हॅपिनेस्ट पालघरला भरभरून प्रतिसाद मिलाला आहे. झपाट्याने प्रगती करणाऱ्या ठिकाणी संतुलित व सर्वांगीण जीवन देऊ करणाऱ्या व उत्तम प्रकारे आखलेल्या घरांना किती मागणी आहे ते या प्रकल्पाला मिळालेल्या यशामुळे अधोरेखित होते.’

महाराष्ट्रातील नव्या जिल्ह्यात मोक्याच्या ठिकाणी असलेल्या ‘हॅपिनेस्ट’मध्ये ८.३५ एकर क्षेत्रामध्ये अंदाजे ८५० अपार्टमेंटचा समावेश आहे. या प्रकल्पातील अपार्टमेंची किंमत ८.५ लाख रुपये ते २४ लाख रुपये यादरम्यान आहे; तसेच कार्पेट क्षेत्र १५७ चौरस फुटांपासून ५४ चौरस फुटांपर्यंत आहे. ‘हॅपिनेस्ट’मधील रहिवाशांना विविध प्रकारे कनेक्टिविटीचे पर्याय व जवळपास सामाजिक सुविधा यांचा लाभ मिळणार आहे. हा प्रकल्प पालघर स्थानकापासून थोड्याच अंतरावर आहे व बोईसर या अंदाजे १३०० सक्रिय औद्योगिक प्रकल्पांचा समावेश असलेल्या व मोठ्या प्रमाणात रोजगार देणाऱ्या बोईसरमधील एमआयडीसीपासून काही मिनिटांवर आहे.

या प्रकल्पाचे लक्षणीय प्रमाणातील ग्राहक अंधेरी–विरार या पट्ट्यातील आहेत. हे सर्व ग्राहक, मुंबईतील महत्त्वाच्या परिसरांशी चांगल्या प्रकारे जोडली गेलेली व कुटुंबियांना आरामदायी जीवनशैली देणारी घरे घेण्याची आकांक्षा असलेले आहेत. महाराष्ट्रातील भरभराटीला आलेले औद्योगिक केंद्र व लोकप्रिय पर्यटन केंद्र असलेल्या पालघरची निवड राज्य सरकारने पायाभूत सुविधांचा विकास वेगाने करण्यासाठी केली आहे. नव्या जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या पालघरमध्ये बांधकामाला आधीपासूनच वेग आला आहे.

मुंबई-अहमदाबाद हाय स्पीट रेल (एमएएचएसआर) या भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाला पालघरनजीक थांबा मिळण्याची अपेक्षा आहे व त्यामुळे मुंबईशी असलेली कनेक्टिविटी वाढणार आहे; तसेच पायाभूत सुविधांची निर्मिती व व्यवसायातील प्रगती यासाठी आणखी पर्याय खुले होणार आहेत.

‘हॅपिनेस्ट’मध्ये सर्वोत्तम वैशिष्ट्ये व सुविधा उपलब्ध आहेत. कॉमन फॅसिलिटी सेंटर, जॉगर्स पार्क, क्रिकेट पिच, कम्युनिटी हॉल, ज्येष्ठ नागरिकांसाठी क्षेत्र, बालकांना खेळण्यासाठी परिसर व बॅडमिंटन कोर्ट, पर्यावरणपूरक परवडणारी घरे ही महिंद्रा लाइफस्पेसेसची परंपरा कायम राखत, ‘हॅपिनेस्ट’मध्ये ऊर्जाक्षम भिंती व छतांची रचना,  लँडस्केप केलेल्या ठिकाणी व पथदिव्यांसाठी एलईडी, ऑरगॅनिक वेस्ट ट्रीटमेंट आणि रेनवॉटर हार्वेस्टिंग याद्वारे संसाधनांचा काटेकोर वापर करण्यात आला आहे. या प्रकल्पाला ‘आयजीबीसी’अंतर्गत अगोदरच ग्रीन अफोर्डेबल हाउसिंगसाठी ‘प्लॅटिनम’ प्रमाणपत्र मिळाले आहे.

महिंद्रा लाइफस्पेसेस २०१४पासून ‘हॅपिनेस्ट’ या कॅटेगरी ब्रँडद्वारे परवडणाऱ्या घरांच्या श्रेणीमध्ये कार्यरत आहे. चेन्नईमध्ये (हॅपिनेस्ट- आवडी) व एमएमआरमध्ये (हॅपिनेस्ट- बोईसर, हॅपिनेस्ट- पालघर) सध्या सुरू असलेल्या कंपनीच्या परवडणाऱ्या गृह प्रकल्पांनी आतापर्यंत १९००हून अधिक अपार्टमेंटची विक्री केली आहे. अंदाजे १२०० हॅपिनेस्ट होम्स अगोदरच सुपूर्द करण्यात आली आहेत. प्रत्येक हॅपिनेस्ट प्रकल्पाला इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिलचे (आयजीबीसी) प्रमाणपत्र मिळाले आहे आणि संतुलित व निरोगी जीवनासाठी त्यामध्ये पर्यावरणपूरक व ऊर्जाक्षम साहित्य व तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. ग्रीन अफोर्डेबल हाउसिंगसाठी हॅपिनेस्ट, आवडीला भारतातील पहिले आयजीबीसी ‘प्लॅटिनम’ प्रमाणीकरण देण्यात आले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link