Next
‘मत्स्य विज्ञान विद्यापीठाला गौतम बुद्धांचे नाव द्या’
प्रेस रिलीज
Monday, May 14, 2018 | 04:03 PM
15 0 0
Share this storyनागपूर : ‘नागपूरस्थित महाराष्ट्र पशु व मस्य विज्ञान विद्यापीठाला तथागत भगवान बुद्धांचे नाव देण्यात यावे व हा विषय त्वरित मंत्रीमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत ठेवून मंजूर करावा,’ अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार प्रकाश गजभिये यांनी राज्याचे पशु संवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्याकडे नुकतीच निवेदनाद्वारे केली.

या विषयी जानकर यांनी यासंबंधीचा प्रस्ताव मंत्रीमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत ठेवून मंजूर करणार असल्याची ग्वाही आमदार गजभिये यांना दिली. नागपूर शहर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेले असून, डॉ. आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ साली दीक्षाभूमी येथे बौद्ध धम्माची दीक्षा दिली. त्यामुळे नागपूर हे जागतिक दर्जाचे शहर असून, या शहराची बौद्ध धर्मीयांचे शहर म्हणून ओळख निर्माण झाली आहे.

‘नागपूर शहरामध्ये फुटाळा परिसर ‘बुदधीस्ट थीम पार्क’ म्हणून विकसित करण्याचा संकल्प असून, नागपूर सुधार प्रन्यास व नागपूर महापालिकेकडे तसा ठराव करून त्याची मान्यताही आमदार गजभिये यांनी मिळवून घेतली आहे; मात्र भाजप-शिवसेना सरकारकडे हा प्रस्ताव धुळखात पडला आहे. सत्ताधारी बौद्ध व आंबेडकरी अनुयायांचे हितचिंतक आहे, हा केवळ दिखावा असून, प्रत्यक्षात भाजप-शिवसेना सरकारच्या काळात बौद्ध व आंबेडकरी जनतेवरील अन्याय अत्याचारात प्रचंड वाढ झाली आहे,’ असा घणाघाती आरोपही या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार गजभिये यांनी केला.

‘महाराष्ट्राचे एकमेव महाराष्ट्र पशु व मस्य विज्ञान विद्यापीठ नागपुरात स्थापित केले आहे. हा संपूर्ण परिसर निसर्गरम्य असून, फुटाळा तलाव येथे १८४ फूट बुद्धाची मूर्ती बसविण्याचा संकल्पही करण्यात आला आहे. फुटाळा परिसर ‘बुद्धीस्ट थीम पार्क’ म्हणून विकसित करायचा आहे; तसेच या परिसरात अनेक बुद्धविहारे आहेत. त्यामुळे परिसरातील महाराष्ट्र पशु व मस्य विज्ञान विद्यापीठाला तथागत भगवान बुध्दांचे नाव दिले, तर जगातील सर्व बुद्धीस्ट देश आनंदित होतील यात चीन, जापान, थायलंड, कोरीया, मलेशिया, फ्रान्स, बॅंकॉक व अनेक बुद्धीस्ट देशांचा समावेश असेल. या देशांनी मदतच केलेली आहे,’ याकडेही आमदार गजभिये यांनी मंत्री महोद्यांचे लक्ष वेधत ‘हैद्राबाद येथील हुसेन सागरच्या धर्तीवर फुटाळा तलावाचे सौंदर्यीकरण करण्यात यावे व हुसेन सागरच्या बुद्धमूर्तीप्रमाणे फुटाळा तलावाच्या मध्यभागी बुद्धमूर्ती बसवावी. सोबतच संपूर्ण तलावात लेझरशो, कारंजे, मोनो रेल, जागतिक दर्जाचे बुद्ध मनोरे करण्यात यावे,’ अशीही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार गजभिये यांनी  केली.

या वेळी अरुण गाडे, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ टाकसाडे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष संतोष नरवाडे, विजय गजभिये, उत्तर नागपूरचे अध्यक्ष अमोल वासनिक, सतीश गजभिये, विद्यार्थी कार्याध्यक्ष रूद्र धाकडे, अजय टाक, सुरेंद्र मोरे आदी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link