Next
राज्यपालपदाच्या कार्यकाळानंतर राम नाईक यांचा पुन्हा भाजपमध्ये प्रवेश
BOI
Tuesday, July 30, 2019 | 02:10 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : उत्तर प्रदेशच्या राज्यपालपदाचा कार्यकाळ २९ जुलैला संपल्यानंतर ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांनी आज (३० जुलै २०१९) मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात पुन्हा भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राम नाईक यांचे भाजपमध्ये स्वागत केले. त्यांच्या मार्गदर्शनाचा व अनुभवाचा भाजपला लाभ होईल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

या वेळी उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे, प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर, प्रदेश सचिव संजय उपाध्याय, प्रदेश माध्यम विभागप्रमुख व प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रवक्ते अवधूत वाघ, मुंबई भाजप सरचिटणीस अमरजित मिश्रा आणि उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष विनोद शेलार उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना नाईक म्हणाले, ‘उत्तर प्रदेशच्या राज्यपालपदाच्या कार्यकाळाची मुदत काल (२९ जुलै) संपली व त्यानंतर आज पहिले काम म्हणून मी भाजपचे सदस्यत्व स्वीकारत आहे. राज्यपालपद स्वीकारण्यापूर्वी मी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे सुपूर्द केला होता. पक्ष जी जबाबदारी देईल, ती मी पूर्वीपेक्षा अधिक गतीने पार पाडीन.’

प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी नाईक यांची भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचे विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती केली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search