Next
‘सिस्का’तर्फे वाय-फाय एलईडी टेबल लॅम्प
प्रेस रिलीज
Thursday, August 16, 2018 | 05:27 PM
15 0 0
Share this article:

मुंबई :  ‘सिस्का एलईडी’ने वायफायला जोडला जाणारा स्मार्ट टेबल लॅम्प सादर केला आहे. विशेष म्हणजे हा लॅम्प ‘अॅमेझॉन अॅलेक्सा’ला सुसंगत आहे. हा लॅम्प ‘अॅमेझॉन अॅलेक्सा’ला जोडला की, वापरकर्त्याला आवाजाद्वारे त्याला नियंत्रित करता येते. 

‘हा लॅम्प वॉर्म व्हाईट, डे लाईट आणि कूल व्हाईट अशा तीन वेगवेगळ्या रंगांचा उजेड देतो. तुमच्या गरजेनुसार आणि मूडनुसार तुम्ही त्याचे नियोजन करू शकता. तुम्हाला किती उजेड हवा आहे, त्याप्रमाणे तुम्ही प्रकाशाची तीव्रता नियंत्रित करू शकता. डोळ्यांवर कोणत्याही प्रकारचा ताण येऊ न देता तुम्हाला विनासायास वाचनाचा आनंद घेता यावा, म्हणून तो विशिष्ट मर्यादेपर्यंत वाकवण्याची सुविधा यात आहे;तसेच याचे आयुर्मान ही तब्बल ३० हजार तासांचे आहे. या दिव्यामुळे विजेच्या वापरात ९० टक्के बचत होईल. सिस्का एलईडी दिवे हे पर्यावरणस्नेही, सुरक्षित आणि फेरवापर योग्य असून, शिसे किंवा पाऱ्यासारखे कोणतेही घातक घटक त्यात नाहीत. सिस्का स्मार्ट टेबल लॅम्प ३,६९९ रुपये या आकर्षक किमतीत अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत’, अशी माहिती सिस्का ग्रुपचे कार्यकारी संचालक गुरुमुख उत्तमचंदानी यांनी दिली. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search