Next
पंकज कुरुलकर
BOI
Wednesday, September 06, 2017 | 04:00 AM
15 0 0
Share this article:

अत्यंत रोखठोक प्रकारे आपल्या आजूबाजूला असलेलं सामाजवास्तव आपल्यासमोर मांडून त्यातल्या बेधडक सत्यानं वाचकाला अस्वस्थ करणाऱ्या पंकज कुरुलकर यांचा दहा सप्टेंबर हा जन्मदिन. आज त्यानिमित्त ‘दिनमणी’मधून त्यांची थोडक्यात ओळख.
........................

पंकज कुरुलकर

१० सप्टेंबर १९६२ रोजी जन्मलेले पंकज कुरुलकर हे आधुनिक कथाकारांपैकी एक लक्षणीय नाव. लहान वयात आत्यंतिक गरिबीला तोंड देऊन वाढताना आलेल्या अनुभवांमधून त्यांचं लेखन घडत गेलं. पुढे स्वतःचा उत्तम चाललेला व्यवसाय बॅकफूटवर ठेवून त्यांनी पूर्णवेळ लेखन स्वीकारलं. अधोविश्वावर त्यांनी प्रामुख्यानं लेखन केलं आहे. मुंबईतल्या बारगर्ल्स, टॅक्सी ड्रायव्हर्स, रिक्षा ड्रायव्हर्स, रात्रीचं गुन्हेगारी विश्व, स्त्रियांची अगतिकता, स्त्रियांवरचे अत्याचार  असं सर्व वाचून, ऐकून त्यांनी त्याभोवती फिरणाऱ्या सक्षम कथा लिहिल्या आहेत.

तेंडुलकर, जीए, व्यंकटेश माडगूळकर, जॅक लंडन, दोस्तोयव्स्की यांच्याकडून स्फूर्ती घेऊन कुरुलकर लिहित आलेत. त्यांच्या कथा जळजळीत समाजवास्तव आपल्यासमोर मांडतात. अत्यंत रोखठोक प्रकारे आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना ते आपल्यासमोर मांडतात – त्यातलं बेधडक सत्य आपल्याला दचकवून जातं.

लंडनच्या चिपमुन्का पब्लिकेशन या ‘मेंटल हेल्थ’विषयी लिहिणाऱ्या प्रख्यात संस्थेतर्फे त्यांच्या पुस्तक प्रकाशनाचा योग आला आहे. त्यांना श्री. दा. पानवलकर पुरस्कार, आपटे वाचन मंदिर पुरस्कार अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.

रेंट रेस, अंधाराच्या दाही दिशा, चिरंतन दुःखाचे स्रोत, तमसो मा, अनादि अनंत, जंगल, मनोमिलन, काळोखलेला आसमंत - अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search