Next
‘जलसाक्षरता वाढीस लागली पाहिजे’
प्रेस रिलीज
Thursday, March 22 | 03:24 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘ग्रामीण भागापेक्षा शहरी भागाला पाणी सहज उपलब्ध होते. शहरांनी स्वतःचे पाणी स्वतः उपलब्ध करायला, वाचवायला शिकले पाहिजे. पाण्याचे विषम वाटप हा भविष्यात काळजीचा विषय होणार आहे. त्यामुळे जलसाक्षरता वाढीस लागली पाहिजे,’ असे प्रतिपादन साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले.

‘रोटरी क्लब डिस्ट्रीक्ट ३१३१’च्या ‘जलोत्सव २०१८’चे  (वॉटर फेस्टीव्हल) उद्घाटन डॉ. देशमुख यांच्या हस्ते आले. त्या वेळी ते बोलत होते. मंगळवारी (२० मार्च) दुपारी घोले रोड येथील जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवनात झाला.

या वेळी रोटरी प्रांतपाल अभय गाडगीळ, ‘पुणे ३१३१’चे प्रकल्प संचालक आणि ‘जलोत्सव’चे संयोजक सतीश खाडे, भूजल शास्त्रज्ञ उपेंद्र धोंडे, प्रदीप पुरंदरे, दीपा दाढे, संजय कुलकर्णी, ‘रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवनचे अध्यक्ष गणेश जाधव, रोटरी क्लब ऑफ पुणे रॉयलचे अध्यक्ष उदय कुलकर्णी, पौड रोड रोटरीच्या अध्यक्ष दीप्ती पुजारी, अशोक भंडारी उपस्थित होते.

डॉ. देशमुख म्हणाले, ‘आधुनिक जीवनशैली, ग्लोबल वॉर्मिंग, नागरीकरण यामुळे पाण्याचा बेहिशेबी वापर वाढला आहे. दुसरीकडे काही भागात शेतीसाठी ही गरजेपेक्षा अधिक पाणी वापरले जाते. पाण्याची साठवणूक आणि पाण्याचा योग्य वापर हे रॉकेट सायन्स नाही, तरीही ते सर्वत्र पोचले नाही. पाणी अडत का नाही, झारीतील शुक्राचार्य कोण आहेत, ते शोधले पाहिजेत. कारखान्यांनीही पाण्याचा पुनर्वापर केला पाहिजे. आपण नद्या शुद्ध ठेऊ शकत नाही, ही शरमेची बाब आहे. या पार्श्वभूमीवर ‘जलोत्सव’ हे जलसाक्षरतेच्या दिशेने उचललेले योग्य पाऊल आहे.

पुण्यातील दहा रोटरी क्लब्सनी एकत्र येऊन २० ते २२ मार्च या कालावधीत जलोत्सव आयोजित केला आहे. यामध्ये रोटरी क्लब ऑफ पुणे सिंहगड रोड, रोटरी क्लब ऑफ पुणे सहवास, रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवन, रोटरी क्लब ऑफ निगडी, रोटरी क्लब ऑफ रॉयल, रोटरी क्लब ऑफ पौड रोड, रोटरी क्लब ऑफ शनिवारवाडा, रोटरी क्लब ऑफ अपटाऊन, रोटरी क्लब ऑफ चिंचवड, रोटरी क्लब ऑफ साऊथ यांचा समावेश आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link