Next
कल्याणमध्ये महिला कविसंमेलन उत्साहात
मिलिंद जाधव
Wednesday, April 03, 2019 | 12:05 PM
15 0 0
Share this article:



कल्याण : आपले विचार कवितेतून मांडण्यासाठी व महिलांना विचारमंच उपलब्ध करून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि काव्य दिनानिमित्त ‘ती’चा काव्यप्रवास या समूहातर्फे कल्याण शहरातील सार्वजनिक वाचनालय येथे महिला कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ कवयित्री दीपा ठाणेकर व  योगिनी राऊळ होत्या. ‘कविता कशी लिहावी व कवितेचे स्वरूप कसे असावे, त्याकडे बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे. कविता लिहिताना वाचन करणे खूप महत्त्वाचे आहे. तेव्हाच तुमची कविता प्रभावी बनेल व इतरांच्या मनात बसेल,’ असे प्रमुख पाहुण्यांनी महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले.



‘ती आणि तिचा प्रवास’ या कार्यक्रमाची संकल्पना अनिता इंगळे यांनी मांडली असून, या कार्यक्रमाचे आयोजन  कवयित्री अनिता इंगळे व प्रणाली कदम यांच्या वतीने करण्यात आले होते. या संमेलनात मुंबईमधील ४५  कवयित्री सहभागी झाल्या होत्या. त्यांनी आपल्या स्वरचित दर्जेदार कविता सादर केल्या. सहभागी कवयित्रींना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. पुढील कार्यक्रम बाल आश्रमात आणि वृद्ध आश्रमात करण्याचा मानस असल्याचे आयोजकांतर्फे सांगण्यात आले.

सूत्रसंचालन कवयित्री अनिता इंगळे यांनी केले. कवयित्री प्रणाली कदम यांनी आभार मानले.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search