Next
राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेस चांगला प्रतिसाद
प्रेस रिलीज
Saturday, January 27 | 03:12 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘महाराष्ट्र कॉस्मोपाॉलिटन एज्युकेशन (एमसीई) सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी (डिप्लोमा) आणि महाराष्ट्र स्टेट बोर्ड टेक्निकल एज्युकेशन (मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘फार्मा व्हिजन २०१७-१८’ या राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन केले होते. नुकत्याच झालेल्या या स्पर्धेत राज्यातील विविध भागांतून ३० संघ सहभागी झाले होते,‘ अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एन. जगताप यांनी दिली.

महाराष्ट्र स्टेट बोर्ड टेक्निकल एज्युकेशनचे संचालक डॉ. व्ही. एम. मोहितकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. ‘फार्मसी संस्थांनी उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करावे. आपल्याला जे आवडते तेच कार्य करा, तरच तुम्ही तुमच्या कामावर प्रेम कराल,’ असा सल्ला त्यांनी या वेळी दिला. या वेळी ‘एमएसबीटीआरओ’चे उपसचिव डॉ. एम. आर. चितलंगे, ‘एमसीई’चे सचिव लतीफ मगदूम, सहसचिव प्रा. इरफान शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

प्राचार्य जगताप यांनी स्वागत केले. ‘इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी (डिप्लोमा) हे भारतातील प्रथम डिप्लोमा फार्मसी इन्स्टिट्यूट आहे, ज्याने ‘नॅशनल बोर्ड ऑफ अ‍ॅक्रिडीटेशन’ला अर्ज करून परिक्षण झाले आहे,’ असे त्यांनी सांगितले.
 

डॉ. चितलंगे यांनी ‘महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन’च्या विविध योजना व उपक्रमाची माहिती दिली व उत्तम नियोजनाबद्दल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे आभार मानले.
 

स्पर्धेचे परीक्षण इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, कोल्हापूरचे माजी प्राचार्य मोहन बांदीवडेकर, डॉ. जे. झे. मगदूम फार्मसी कॉलेजचे (जयसिंगपूर) उपप्राचार्य ए. के. आपटे, आणि सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसीचे (शिरूर) अमोल शह यांनी केले. स्पर्धेतील विजेत्यांना मोहन बांदीवडेकर यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.
 
आकाश राजभोर, नई मुद्दीन चौधरी (एमईटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी (डिप्लोमा) बांद्रा, मुंबई) यांनी प्रथम पारितोषिक पटकाविले. त्यांना सात हजार ५०० रुपये आणि प्रशस्तीपत्रक देण्यात आले. प्रणिता खारतोडे, साजिद पठाण (दत्तकला शिक्षण संस्थेचे, अनुसया इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी (डिप्लोमा) दौंड, पुणे) यांनी द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. पाच हजार आणि प्रशस्तीपत्रक देऊन त्यांना गौरविण्यात आले. मानसी देशमुख आणि नम्रता लोखंडे (व्ही. जे. एस. एम. मुंबई इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी फॉर वुमेन जुन्नर) यांना तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. त्यांना दोन हजार ५०० आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.

राज्यातील विविध फार्मसी महाविद्यालयांतील प्राचार्यही या वेळी उपस्थित होते. स्पर्धेचे सूत्रसंचालन सबा शेख यांनी केले. किर्ती सपारे यांनी आभार मानले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी म्हणत घेतली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link