Next
‘पीएनजी’च्या २७ व्या दालनाचे उद्घाटन
प्रेस रिलीज
Friday, January 19, 2018 | 05:50 PM
15 0 0
Share this article:

पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सच्या २७ व्या दालनाच्या उद्घाटनाप्रसंगी सोन्याची चेन कापताना खासदार श्रीरंग बारणे आणि निर्मला दानवे.

पुणे :
उत्कृष्टता, विश्वसनीयता आणि नवकल्पनांवर आधारित असलेला ब्रँड पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सच्या पुण्यातील पिंपरी येथे नवीन दालनाचे उदघाटन करण्यात आले. या भव्य दालनाच्या उदघाटनास बॉलिवूडचा सुलतान सलमान खानची उपस्थिती लाभली. खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते या नवीन दालनाचे उदघाटन करण्यात आले.

या वेळी पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ, पराग गाडगीळ, निर्मला दानवे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. सहा हजार चौरस फूटामध्ये विस्तारलेल्या या दालनामध्ये हॉलमार्क प्रमाणित सोने, चांदी आणि हिर्‍यांच्या दागिन्यांचे व्यापक आणि सुंदर कलेक्शन्स आहेत जे पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स यांच्या समृद्ध परंपरेचे दर्शन घडवितात.

या दालनामध्ये खास मीनाकारी, जडाऊ, कुंदन आणि टेंपल आणि कास्टिंग एलिमेंट्स पिसेस व्यतिरिक्त क्लासिक सोन्याचे दागिने आहेत. उत्कृष्ट दर्जाच्या या दालनाचे इंटिरियर्स संगीतातून प्रेरणा घेतलेले आहे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील हे सर्वात मोठ्या ज्वेलरी स्टोअरपैकी एक आहे.

या दालनाचे उद्घाटन सलमान यांच्या उपस्थितीत पार पडल्यानंतर खासदार श्रीरंग बारणे आणि निर्मला दानवे यांच्या हस्ते सोन्याची चेन कापण्यात आली. सलमान खानचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट 'टायगर जिंदा है'च्या पार्श्वभूमीवर सोन्याचा मुलामा दिलेला ३ फूट आकाराचा वाघ स्मरणिका म्हणून सौरभ गाडगीळ आणि त्यांच्या पत्नी राधिका गाडगीळ यांच्या हस्ते सलमान खानला भेट देण्यात आला.

या दालनात पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सतर्फे त्यांच्या ग्राहकांना उत्तम श्रेणीच्या सोन्याच्या दागिन्यांच्या बनावटी शुल्कावर १५ टक्के आणि हिर्‍यांच्या दागिन्यांच्या बनावटी शुल्कावर ५० टक्के सवलत दिली जाणार आहे. १२ ते ३१ जानेवारी २०१८ या कालावधीत ही आकर्षक ऑफर सुरू राहील.

पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सच्या पिंपरी येथील दालनाच्या उद्घाटनाला उपस्थित बॉलीवूडचा आघाडीचा अभिनेता सलमान खानरिटेल दागिन्यांच्या उद्योगक्षेत्रात अग्रेसर असलेल्या पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सला पुण्यातील पिंपरी येथील दागिने प्रेमींसाठी उत्तम ग्राहक सेवा, उत्कृष्ट कारागिरी आणि कौशल्य देऊ करण्यात अभिमान वाटतो आहे. पिंपरी हा पुण्याचा प्रगतिशील भाग आहे, येथील रहिवासी कॉस्मोपॉलिटन जीवनशैलीकडे झुकणारे आहेत. जागतिक ज्वेलर्स असलेल्या पु. ना. गाडगीळ ज्वेलर्ससाठी ही मोठी बाजारपेठ आहे.

पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सची जगभरात सध्या २७ दालने आहेत. पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सने जागतिक दर्जाची गुणवत्ता आणि सौंदर्य सातत्याने टिकवून ठेवले आहे आणि प्रत्येक कलेक्शनमध्ये डिझाइन्सचे वैविध्य देऊ केले आहे.

या वेळी ‘पीएनजी’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ म्हणाले, ‘पुण्यातील पिंपरी भागात सेवा देण्यासाठी मी अतिशय उत्साही आणि आनंदी आहे. आमच्या या नवीन दालनात विविध प्रकारचे सुबकतेने घडविलेले दागिन्यांचे नमुने आहेत जे नक्कीच आमच्या ग्राहकांच्या स्टाईलमध्ये वाढ करतील. शिवाय, आमचा जागतिक ब्रँड अँबेसिडर सलमान खान यांच्या उपस्थितीत आमच्या २७व्या दालनाचे पुण्यात उद्घाटन होत असल्याने मला अभिमान वाटत आहे, त्यांनी कायम केलेल्या सहकार्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.’

अभिनेता सलमान खान म्हणाला, ‘पु. ना. गाडगीळ ज्वेलर्ससोबत जोडलेले असणे हे माझे भाग्य आहे. गेल्या तीन वर्षांपासून मी या ब्रँडसोबत जोडलेलो आहे. ब्रँडला पुढेही असाच पाठींबा द्यायला मला आनंदच वाटणार आहे. ध्येयवादी सौरभ गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सने आपली उपस्थिती आणि आपला ग्राहकवर्ग मजबूत केला आहे. त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांना त्यांच्या भविष्यकालीन प्रयत्नांसाठी शुभेच्छा देतो.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search