Next
‘महापुरुषांचा इतिहास प्रेरणादायी’
प्रेस रिलीज
Tuesday, May 22 | 12:35 PM
15 0 0
Share this story

शिवतेज दहीहंडी संघ व भोईराज दहीहंडी संघ यांचा  सत्कार करताना प्रा. नितीन बानगुडे व नगरसेवक रवींद्र चव्हाण

पुणे : ‘महापुरुषांनी नव्या पिढीला आपल्या जगण्यातून आदर्श निर्माण करून दिले आहेत. त्यांच्या आदर्शांवर चालणे ही तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे. इतिहासातील एक आदर्शवादी आणि तत्ववादी योद्धा म्हणून छत्रपती संभाजी राजेंचे नाव घ्यावे लागेल,’ असे प्रतिपादन प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी केले. रवींद्र चव्हाण युवा मंचातर्फे धर्मवीर संभाजी महाराज उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

शनिवारवाड्याच्या प्रांगणात पार पडलेल्या या जयंती उत्सवाचे यंदाचे हे चौथे वर्ष होते. समाजात निरपेक्षपणे काम करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला कौतुकाची थाप मिळणे आवश्यक असते. या कौतुकामुळे त्यांना नवी उमेद मिळते आणि त्याच प्रेरणेने समाजासाठी निरंतर काम करत राहतो. हाच उद्देश समोर ठेऊन प्रत्येकवर्षी संभाजी महाराज जयंतीनिमित्त समाजात उत्तम कार्य करणाऱ्या संस्थाचा सत्कार रवींद्र चव्हाण युवा मंचातर्फे केला जातो. यावर्षी  कसबा पेठेतील त्वांष्टा कासार महिला समाज संघ, लुई-ब्रेल अंध अपंग कल्याण संस्था, शिवतेज दहीहंडी संघ व भोईराज दहीहंडी संघ यांना प्रा. बानगुडे-पाटील यांच्या हस्ते  पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

कसबा पेठेतील त्वांष्टा कासार महिला समाज संघ सत्कार करताना प्रा. नितीन बानगुडे व रवींद्र चव्हाणबानगुडे-पाटील म्हणाले, ‘इतिहास हा अनेकांच्या अभ्यासाचा, व्यासंगाचा, अभिमानाचा, स्वाभिमानाचा तसेच प्रेरणेचा विषय आहे. इतिहास हा विषय आपल्याला जागृत करणारा तसेच चिंतन करायला लावणारा विषय आहे. युगायुगातून युगप्रवर्तक माणसे निर्माण होत असतात जी तुम्हा आम्हाला वसा आणि वारसा देत असतात तो वसा जपणे आणि त्यांनी दिलेल्या आदर्शांवर चालत राहणे तुमची आमची सर्वात मोठी जबाबदारी आहे. छत्रपती संभाजी महाराज हे त्या व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली. ते स्वराज्य टिकवण्याचे आणि संवर्धित करण्याचे काम छत्रपती संभाजी राजांनी केले. त्यांचे जीवनकार्य सर्वसामन्यांना स्फूर्ती देणारे आहे. महाराजांनी स्वराज्याला नवी प्रेरणा दिली. हे फक्त वाचनातून आत्मसात करण्यापेक्षा त्यांच्या कार्याचा आदर्श सर्वांनी घेऊन आपण सर्वांनी तो अंमलात आणला पाहिजे.’

या वेळी रवींद्र चव्हाण युवा मंचाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण, नगरसेवक विशाल धनवडे, नगरसेविका पल्लवी जावळे, प्रशांत बधे, राजेंद्रनाना शिंदे, बाळासाहेब मालुसरे, राजेश बरगुजे आदी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link