Next
‘स्मिंक’तर्फे ‘लाइव्ह नाऊ’ अॅप सादर
प्रेस रिलीज
Saturday, April 21, 2018 | 04:45 PM
15 0 0
Share this story

पुणे : डॉक्टर्स आणि क्लिनिक्सची यशस्वी जोडणी करून त्यात यश संपादन केल्यावर पुण्यातील स्टार्टअप स्मिंकने ‘वर्ल्ड्स प्लेसेस लाइव्ह नाऊ’ हे जागतिक उपभोक्ता अॅप सादर केले. पूर्वी आपल्याला स्मिंकच्या अॅपवर फक्त क्लिनिक्स मधील रांगाबद्दलची लाइव्ह माहिती मिळत होती; पण आता या अॅपमुळे जगातील कुठल्याही ठिकाणाषयी लाइव्ह माहिती आता वापरकर्त्यांना मिळणार आहे.  

‘स्मिंक’ हे समुदायाने वापरायचे एक उत्तम व्यासपीठ असून, त्यावर जगातील कुठल्याही ठिकाणाची ‘लाइव्ह’ माहिती प्रक्षेपित होणार आहे. क्लबमध्ये कोणते गाणे वाजवले जात आहे, या संध्याकाळी शेफने काय स्पेशल बनवले आहे, जवळच्या संग्रहालयात किती गर्दी आहे, अशा अनेक प्रश्नांची माहिती या अॅपद्वारे मिळणार आहे. फोटो, केवळ टेक्स्ट मेसेज किंवा १५ सेकंदांचा छोटा व्हिडीओ या तीन प्रकारांपैकी कोणत्याही एका प्रकारात तुम्ही या अॅपवर आपली माहिती प्रक्षेपित करू शकता. 

या अॅपवर कोणतीही चुकीची किंवा खोटी माहिती अपलोड होणार नाही याची ‘स्मिंक’ने पूर्णपणे काळजी घेतली आहे. प्रत्येक पोस्ट लोकेशन बघून ‘व्हेरिफाय’ केली जाते आणि त्याप्रकारे ‘व्हेरीफाईड पोस्ट’ म्हणून मार्क केली जाते. वापरकर्ते लोकेशन व्हेरिफाय न करताही पोस्ट करू शकतात; पण त्या पोस्टला व्हेरिफाय असा मार्क मिळत नाही. भविष्यातदेखील आणखी सुधारणा करून अचूक माहिती प्रक्षेपित करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. हे अॅप वापरणारा समुदाय एखादी पोस्टडाउन वोट करून फेक मार्क करू शकतात. पोस्ट केल्यानंतरच्या २४ तासांत कंटेंट या अॅपवरून निघून जात असल्यामुळे फीडही नेहमीच अपटुडेट राहते.

‘स्मिंक’चे हे नवीन अॅप युसर्सने समर्थित केले असून, यावरील सर्व माहिती ही हे अॅप वापरणाऱ्यांनी यावर प्रक्षेपित केली आहे. कंपनीने सुरवातीला या अॅपबद्दल जागरूकता निर्माण व्हावी आणि विविध शहरे ही या अॅपच्या माध्यमातून जगभरात पोहोचावीत यासाठी लोकल चँपियन ही स्पर्धा सुरू केली असून, सुरुवातीला या अॅपवर पोस्ट करणाऱ्यांना लोकल चँपियन बनण्याची संधी आहे.

सुरुवातीच्या काळात या अॅपद्वारे पुणे आणि बंगळूर या दोन शहरांवर लक्ष केंद्रित केले जाणार असले, तरी हे अॅप जागतिक दर्जाचे असून, विविध भाषा आणि देशातून यावर वापरकर्ते कोठूनही आपली माहिती क्षेपित करू शकतात.  

‘स्मिंक’चे सीईओ आणि सह- संस्थापक सचिन भारद्वाज म्हणाले, ‘आजच्या काळात आपल्याला इंटरनेटस्थिर स्वरूपातील माहिती उपलब्ध करून देते. ज्यामध्ये रिव्ह्यू, रेटिंग, पत्ते किंवा फोन नंबर्स यांचा समावेश आहे. आपण बऱ्याचदा भावनावश होऊन कोठेतरी जाण्याचा अचानक निर्णय घेतो; पण आपल्याला जिथे जायचे आहे त्याठिकाणी आत्ता काय होत आहे ही माहिती इंटरनेटवर उपलब्ध नसते. आज रात्री कुठल्या पबमध्ये जास्ती रंगतदार पार्टी आहे, आजचे भाजीमार्केटचे दर काय आहेत, माझ्या जिममध्ये किंवा सोसायटीच्या स्विमिंगपूलमध्ये किती गर्दी आहे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला ‘स्मिंक’वर मिळतील. ‘स्मिंक’द्वारे आम्हाला वापरकर्त्यांना रियल टाइम माहिती प्रक्षेपित करण्यास सांगायचे आहे. ज्याचा फायदा त्याठिकाणी जाण्याची तयारी करणाऱ्या त्यांच्या मित्रांना आणि इतर वापरकर्त्यांना होईल.’
 
‘टेस्टीखाना.कॉम’ या आपल्या पहिल्या यशस्वी कंपनीनंतर सचिन भारद्वाज, संतोष नागराजन आणि शेल्डन डिसुझा यांनी २०१५ला ‘स्मिंक’ची सुरुवात केली. जगभरातील ठिकाणांची माहिती आणि रियलटाइम अपडेट मिळवणारे एक व्यासपीठ तयार करणे हा ‘स्मिंक’चा मुख्य हेतू आहे. या अॅपवर सतत होणारी ट्रोलिंग, शिवीगाळ किंवा चुकीची भाषा आणि डेटाचा अतिरिक्त वापर या मुख्य गोष्टींचा बंदोबस्त केला गेला आहे. ज्यामुळे युसर्सचे पूर्णपणे संरक्षण होणार आहे. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link