Next
‘सह्याद्री’मध्ये मूत्रपिंड व स्वादुपिंडाचे प्रत्यारोपण
प्रेस रिलीज
Friday, July 27, 2018 | 12:49 PM
15 0 0
Share this story

मूत्रपिंड व स्वादुपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी केलेली सह्याद्री हॉस्पिटल्सची वैद्यकीय टीम

पुणे : सह्याद्री हॉस्पिटल्सतर्फे डेक्कन येथील सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मूत्रपिंड व स्वादुपिंडाची एकाच वेळेस अतिशय गुंतागुंतीची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया नुकतीच करण्यात आली. याआधी मूत्रपिंड व स्वादुपिंड एकाच वेळेस प्रत्यारोपण करण्याच्या शस्त्रक्रिया चार वेळा करण्यात आल्या होत्या. पश्‍चिम भारतात पहिल्यांदाच अशा प्रकारे मूत्रपिंड व स्वादुपिंड एकाच वेळेस प्रत्यारोपण पाच वेळा करणारे सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे पहिलेच केंद्र ठरले आहे.

याविषयी बोलताना सह्याद्री हास्पिटल्सचे यकृत व प्रत्यारोपण शल्यविशारद डॉ. बिपीन विभुते म्हणाले, ‘सह्याद्री हॉस्पिटल्सतर्फे मुंबई येथील कुणाल पंडित या ५२ वर्षीय रुग्णावर अशाप्रकारे एकाच वेळेस मूत्रपिंड व स्वादुपिंडाचे प्रत्यारोपण करण्यात आले होते. या रुग्णाचे मूत्रपिंड सात वर्षांपासून निकामी झाले होते. त्यांना २५ वर्षे मधुमेह असल्यामुळे ही परिस्थिती ओढावली होती. त्याचबरोबर त्यांच्या दोन्ही पायांमध्ये अशक्तपणा जाणवत होता. त्यांना आठवड्यात दोनदा डायलिसिस व इन्सुलिनच्या मोठ्या डोसवर अवलंबून राहावे लागायचे. ते पूर्णपणे आपल्या निवृत्त आई-वडिलांवर अवलंबून होते.’

याप्रसंगी बोलताना मल्टीविसेरल ट्रान्सप्लांट सर्जन प्रा. डॉ. अनिल वैद्य म्हणाले, ‘मधुमेहाने ग्रस्त असलेल्या कुणाल पंडित यांची आरोग्य समस्या फक्त मुत्रपिंडापर्यंत मर्यादित नव्हती, तर त्यांचे हृदयाचे कामकाजही कमकुवत होते आणि त्यामुळे प्रत्यारोपणासाठी ते शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे तयार नव्हते. आम्ही शस्त्रक्रिया सुरू करताना त्यांच्या पोटावरती भरपूर चरबी होती आणि त्यांच्या मुख्य रक्तवाहिन्या ज्या हृदयापासून जठर आणि पायांपर्यंत प्राणवायू घेऊन जातात, ते संपूर्ण कॅल्शियम साठल्याने भरले होते. त्यामुळे स्वादुपिंड व मुत्रपिंडाला रक्तपुरवठा करण्यासाठी जागा नव्हती. त्यामुळे आम्हाला एक क्षण असे वाटले, की त्यांच्यावर प्रत्यारोपण होऊ शकत नाही; पण प्रदीर्घ चर्चेनंतर आम्ही अजून एक पर्याय अवलंबिण्याचे ठरविले. कारण त्याशिवाय त्यांना जास्त वेळ जिवंत राहाणे अवघड होते. म्हणून आम्ही पायातील रक्तवाहिन्यांमध्ये छिद्र केले. ज्यामुळे पुरेसा रक्तपुरवठा होऊ शकतो की नाही हे आम्हाला कळेल. सुदैवाने आम्हाला एक सेमीचा पॅच मिळाला ज्याद्वारे नवीन स्वादुपिंड व मुत्रपिंडाला रक्तपुरवठा होऊ शकेल. एरवी वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्यारोपण करण्यात येणारे हे दोन अवयव यावेळेस आम्ही एकावर एक असे प्रत्यारोपण केले. प्रत्यारोपण यशस्वी झाले व शस्त्रक्रियेनंतरही देखरेखीदरम्यान रुग्ण स्थिर राहिले व त्यांना प्रत्यारोपणानंतर सातव्या दिवशी घरी सोडण्यात आले.’

वरिष्ठ भूलतज्ञ डॉ. दिनेश बाबू म्हणाले, ‘शस्त्रक्रियेनंतर रुग्ण काही दिवस इन्सुलिनच्या छोट्या डोसांवर होते, तरी त्यांना डायलिसिसची गरज आतापर्यंत भासली नाही व आता इन्सुलिन व मधुमेहाशी निगडीत इतर औषधांची देखील गरज नाही. मुत्रपिंडाच्या शेवटच्या टप्प्याच्या आधाराने ग्रस्त असलेल्या या रुग्णाला अशाप्रकारच्या शस्त्रक्रियेमुळे जीवनदान मिळाले असून, अशा प्रकारची अभिनव शस्त्रक्रिया ही जगातील बहुधा पहिलीच असावी. प्रत्यारोपणानंतर रुग्णाची तब्येत चांगली असून, इन्सुलिन व डायलिसिसची गरज पडली नाही. त्या रुग्णाच्या प्रगतीवर आमची सतत देखरेख आहे.’

मधुमेह हा भारतातील सर्वांत सामान्य समस्यांपैकी एक असून, ती विविध अवयवांवर प्रभाव पडू शकते. मूत्रपिंड व स्वादुपिंड प्रत्यारोपण हा सर्वांत उपयुक्त उपाय आहे; मात्र स्वादुपिंड प्रत्यारोपण अजूनही भारतात दुर्मिळ आहे. मूत्रपिंड व स्वादुपिंडाचे एकाच वेळेस प्रत्यारोपण ही शस्त्रक्रिया ज्यांना साखर नियंत्रणात ठेवायला इन्सुलिनचा जास्त डोस लागतो व ज्यांचे मूत्रपिंड निकामी झाले आहे, अशांवर एकाच वेळेस मूत्रपिंड व स्वादुपिंड पुर्नप्रस्थापित करण्याची प्रक्रिया आहे. या शस्त्रक्रियेमुळे साखरेचे प्रमाण योग्यरित्या नियंत्रित ठेवणे शक्य होते व मधुमेहाच्या प्रतिकुल परिणामांपासून प्रत्यारोपण केलेल्या मुत्रपिंडाचे संरक्षण करते. याशिवाय मधुमेहामुळे इतर अवयव व शरीरातील व्यवस्थांवर होणार्‍या प्रतिकुल प्रभावापासून दूर राहता येते.

रुग्ण कुणाल पंडित म्हणाले, ‘ज्यांना मोठ्या प्रमाणावर मधुमेह असतो त्यांना माझी याआधीची अवस्था व व्याधी कळू शकेल. या आजारामुळे जीवन हे माझ्यासाठी खूप मोठे आव्हान होते आणि त्याचा प्रभाव माझ्या संपूर्ण कुटुंबावर पडत होता. मी ‘सह्याद्री’मधील सर्व डॉक्टरांचा व प्रत्यारोपण टीमचा आभारी आहे, ज्यांच्यामुळे मला नवीन जीवन मिळाले आणि जगण्याचा प्रत्येक क्षण आनंदाने अनुभवता येत आहे. डायलिसिस व इन्सुलिनची गरज नसणे हे या प्रत्यारोपणामुळे शक्य झाले असून, माझ्यासाठी जणू ही स्वप्नपूर्ती आहे. माझे यापुढे ध्येय हे अवयवदानाबाबत जागरूकता निर्माण करणे असेल. कारण यामुळे अनेकांना नवीन आयुष्य मिळू शकते.’

सह्याद्री हॉस्पिटल्सचे युनिट हेड डॉ. केतन आपटे म्हणाले, ‘नवा मापदंड प्रस्थापित करणार्‍या आमच्या डॉक्टर्सच्या संपूर्ण टीमचे मी अभिनंदन करतो. हे अभूतपूर्व यश पुन्हा आमच्या ऑल अबाउट पॉसिबिलिटीज या ध्येयाशी पूरक असून डॉक्टर्स व कर्मचारी जेव्हा त्यांच्या कामकाजाच्या सर्व परिसीमा रुग्णांच्या भल्यासाठी ओलांडतात तेव्हा नव्या व चांगल्या शक्यता निर्माण होतात हे अधोरेखित होते.’

ही गुंतागुंतीची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया अनेक तज्ज्ञ डॉक्टरांमुळे यशस्वी झाली. त्यामध्ये डॉ. बिपीन विभूते, डॉ. अनिल वैद्य, डॉ. दिनेश झिरपे, डॉ. सेंथील कुमार, डॉ. अभिजित माने यांसारखे प्रत्यारोपण शल्यविशारद यांचा समावेश होता; तसेच डॉ. मनीष पाठक, डॉ. निवास व डॉ. दिनेश बाबू हे प्रत्यारोपण भूलतज्ज्ञ, नेफ्रोलॉजिस्ट डॉ. सचिन पाटील, हेपेटोलॉजिस्ट व गॅस्ट्रोइंट्रोलॉजिस्ट डॉ. संदीप कुलकर्णी, ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर्स अरुण अशोकन, अमन, राहुल तांबे आणि वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या शर्मिला पाध्ये यांचा समावेश होता.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link