Next
‘आरओएचएम’तर्फे ‘इंडियन जेन-नेक्स ईव्ही’ सादर
प्रेस रिलीज
Thursday, September 27, 2018 | 12:40 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : आरओएचएम या जपानस्थित आघाडीच्या सेमीकंडक्टर पुरवठादार कंपनीने आपल्या नव्या कमी ऊर्जा वापरणाऱ्या ऊर्जा पर्यायांच्या माध्यमातून भारतातील ई-व्‍हेइकल बाजारपेठेवर लक्ष केंद्रीत केले आहे. यातून नेक्स्ट जेन इलेक्ट्रीक व्‍हेइकल आणि इतर हायब्रिड इलेक्ट्रिक व्‍हेइकलच्या (xEV) वाढत्या मागणीचा वेध घेतला जाणार आहे.

आरओएचएम सेमीकंडक्टरतर्फे ऑटोमोटिव्ह अॅप्लिकेशन्समध्ये शक्ती आणि ऊर्जा व्यवस्थापनाचे नवे पर्याय सादर केले जाणार आहेत. बेंगळुरुत २६ ते २८ सप्टेंबर २०१८ या काळात आयोजित करण्यात येणाऱ्या आगामी ‘इलेक्ट्रॉनिका-इंडिया २०१८’ या व्यापार मेळाव्यात इलेक्ट्रॉनिक्समधील सुटे भाग, यंत्रणा आणि अॅप्लिकेशनचे प्रदर्शन असेल.

‘आरओएचएम’ आपल्या ‘SiC पॉवर डिव्हाइसेस’, ‘अॅनालॉग टेक्नॉलॉजिस’, ‘इन्फोटेनमेंट’, ‘बॉडी अॅंड पॉवरट्रेन’, ‘मेड इन इंडिया-फॉर इंडिया’ या पाच विभागांसह ऑटोमोटिव्ह पर्याय सादर करेल.

दायसुके माकामुराआरओएचएम सेमीकंडक्टर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक दायसुके माकामुरा म्हणाले, ‘या वेळी ‘आरओएचएम’तर्फे भारतातील ईव्ही बाजारपेठेत भविष्यात महत्त्वाची ठरतील अशी उत्पादने आणि पर्याय सादर केले जातील. नेक्स्ट जनरेशन ऑटोमोबाइल आणि त्याच्या परिसंस्थेचा परिणाम फारच नाविन्यपूर्ण असणार आहे आणि जपान, अमेरिका, युरोप व चीन अशा आधुनिक इलेक्ट्रिक व्‍हेइकल बाजारपेठांनी याआधीच ही प्रणाली अवलंबली आहे.’

‘इलेक्ट्रिक व्‍हेइकलची भारतातील वाढती आणि विकसनशील बाजारपेठ कार्बन डाय ऑक्साइडचे उत्सर्जन कमी करण्यात मोठा वाटा उचलू शकते आणि भारताने २०३० पर्यंत इलेक्ट्रिक व्‍हेइकलच्या वापराला चालना देण्याचा सकारात्मक आराखडा बांधला आहे,’ असे नमूद करतानाच ‘आरओएचएम सेमीकंडक्टरच्या नाविन्यपूर्ण पर्यायांची ओळख करून घेण्यासाठी ‘इलेक्ट्रॉनिका-इंडिया २०१८’मधील ‘आरओएचएम’च्या बूथला भेट द्या,’ असे आवाहनही माकामुरा यांनी केले.  
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search