Next
‘बदलत्या तंत्रज्ञाबरोबर वकिलांनी कार्यपद्धती बदलावी’
‘लीगनेट फोरम’ चर्चासत्रादरम्यान वकील व तज्ज्ञांनी मांडले मत
प्रेस रिलीज
Monday, May 20, 2019 | 11:41 AM
15 0 0
Share this article:

पत्रकार परिषदेत बोलताना सुकंद कुलकर्णी. शेजारी राजस पिंगळे, अतुल जुवळे, असीम सरोदे, आर. व्ही. कुलकर्णी, गुरमीत सिंग, मदन लांडे, अनिरुद्ध कोठारी आदी मान्यवर.

पुणे : जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात न्यायपालिकेत जुन्या पद्धतीने कामकाज चालत असल्यामुळे वकील, पक्षकारांना काही अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे आधुनिक काळात न्यायपालिकेतील कामकाजदेखील ‘डिजिटल’ होणे ही काळाची गरज असल्याचे मत तज्ज्ञ वकिलांमार्फत मांडण्यात आले. 

न्यायपालिकेतील कामकाज आधुनिक होण्यासाठी प्रयत्न करणार्‍या ‘लीगलनेट’द्वारा ‘लीगनेट फोरम’ या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान वकील व तज्ज्ञांनी आपली मते व्यक्त केली. या वेळी माजी सत्र न्यायाधीश आर. व्ही. कुलकर्णी, पर्यावरण कायदे तज्ज्ञ अ‍ॅड. असिम सरोदे, मुंबई उच्च न्यायालयातील वकील अ‍ॅड. सुकंद कुलकर्णी, अ‍ॅड. राजस पिंगळे, पुनीत कपूर, अ‍ॅड. अतुल जुवळे, ‘लीगलनेट’चे संस्थापक मंदार लांडे, गुरमीत सिंग, कपिल जवेरी, चंद्रकांत भोजेपाटील, अनिरूद्ध कोटगिरे,  अ‍ॅड. हर्षद काटीकर, अ‍ॅड. अक्षदा गुदाधे, विजय देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

या विषयी बोलताना अ‍ॅड. असीम सरोदे म्हणाले, ‘भारतातील न्यायपालिकेत जुन्या काळात कायद्याच्या पुस्तकांचा ढिग घेऊन वकील युक्तिवाद करताना पहायला मिळायचे. बदलत्या तंत्रज्ञाबरोबर वकिलांच्या कार्यद्धतीतही बदल होणे गरजेचे आहे. त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. फौजदारी खटल्यांना लागणारा कालावधी पाहता अशा खटल्यांमध्ये आत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होणे गरजेचे आहे; मात्र अशा खटल्यांमध्ये डिजिटल प्रणाली वापरासाठी पोलिसांचे सहकार्यही तितकेच महत्त्वाचे आहे.’   

अ‍ॅड. पिंगळे म्हणाले, ‘कागदपत्रे बाळगण्यापेक्षा प्रत्येक वकिलाने स्मार्टफोन किंवा टॅबलेटचा वापरून करून त्यामध्ये कागदपत्रे जमा केली पाहिजे. त्यामुळे कागदपत्रे बाळगणे सोपे होऊन जाईल.’ 

या वेळी उपस्थित तज्ज्ञ वकिलांनी न्यायपालिकेच्या कामकाजात आधुनिक बदल का व्हावे याची माहिती दिली. या चर्चासत्रात देशभरातून अनेक वकिलांनी सहभाग घेतला. ‘लीगल नेक्स्ट’ या मासिकाच्या पहिल्या आवृतीचे या वेळी प्रकाशन करण्यात आले. सामान्य जनतेपासून सर्वांना लीगलनेट हे हक्काच व्यासपीठ ठरेल, असा विश्वासही या वेळी व्यक्त करण्यात आला.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search